आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप केले, दिग्विजय सिंह यांच्या आरोपानंतर ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री अनिल देशमुखांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
फोन टॅपिंग आणि स्नुपिंग झालेल्या नेत्यांमध्ये शरद पवार, दिग्विजय सिंग या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल चौकशी करेल. याबाबत निल देशमुख म्हणाले, "दिग्विजय सिंह यांनी फडणवीस सरकारकडून विरोधीपक्षाचे आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचे म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत इतर पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्त्राईलला कोण गेलं होतं याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."
 

बातम्या आणखी आहेत...