आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे सेवक, ट्विटरवरून मुख्यमंत्री पदाचा उल्लेख हटवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून मुख्यमंत्री हे पद एडिट केले आहे. त्या ठिकाणी फडणवीस यांनी स्वतःचा उल्लेख महाराष्ट्राचा सेवक असे केले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या सल्ल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतरच फडणवीस यांनी हे बदल केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर रोजी संपला. त्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ट्विटर प्रोफाइलमध्ये महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असा केला होता. भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. परंतु, मंगळवारी संध्याकाळी 8.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापित करू शकत नाही. यासाठी अतिरिक्त वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात कुणीही बहुमत सिद्ध करण्याच्या तयारीत नसल्याचे निरीक्षण नोंदवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती.

बातम्या आणखी आहेत...