आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकनेत्यांना पराभूत करण्याचा डाव वर्षा बंगल्यावरच रचण्यात आला होता असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. त्यांनी फडणवीस आणि त्यांच्या अतिशय जवळच्या नेत्यांना 'वर्षा बंगला नाइट क्लब गँग' असे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकी लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीला हीच गँग जबाबदार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
लोकनेत्यांच्या परिसरातील विरोधकांना मजबूत करण्याचे रचले जायचे कट -गोटे
पंकजा मुंडे यांनी परळीत सभा घेऊन कुणाचेही नाव न घेता भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. तर एकनाथ खडसे यांनीही भाजपवर थेट नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी जळगावात आपल्या कन्या रोहिणी आणि परळीत पंकजा मुंडेंच्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले. कटकारस्थान करणाऱ्या भाजप नेत्यांची आपल्याकडे यादी सुद्धा असल्याचे खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या सभेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या सभेच्या अवघ्या दोन दिवसानंतर गोटे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. अनिल गोटे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे येथून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.