आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठीच्या योजना रद्द केल्या तर मोठी लढाई लढू, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्याची महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड योजना बंद होण्याची भीती - फडणवीस
  • 5 वर्षांत जलयुक्त शिवारातून मराठवाड्यात पाणी क्रांती - देवेंद्र
  • जनतेच्या मनातील योजना बंद करू नका - फडणवीस

औरंगाबाद - मराठवड्याच्या पाणी योजना रद्द केल्या तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाला पाठिंबा देत उपस्थितांना संबोधित केले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्या योजना हाती घेतल्या होत्या. त्या या सरकारने पुढे नेल्या नाहीत, तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा य़ावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.जनतेच्या मनातील योजना बंद करू नका - फडणवीस 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडतो. सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपने मराठवाड्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या. मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आता मराठवाड्याची वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी पाणी योजना रद्द होण्याची भीती आहेत. जनतेच्या मनातील योजना बंद करू नका असे फडणवीस म्हणाले. 
दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होते, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले. असही मत त्यांनी यावेळी मांडले. तसेच तुम्हाला क्रेडिट हवं असेल तर घ्या, नाव बदलायच तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.