आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार, लवकरच गोड बातमी मिळेल- सुधीर मुनगंटीवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. यात आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व निर्णय झाले असून, लवकरच गोड बातमी मिळेल आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचे गुढ आता निर्णायक वळणावर आले आहे. दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेसोबत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार झाली आणि लवकरच गोड बातमी मिळेल, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.'भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी'


"आम्ही राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरच राज्यात सरकार स्थापन करू. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व सर्वांना मान्य आहे. त्यामुळे संपूर्ण भाजप देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार लवकरात लवकर स्थापन होणार", असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.