आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday special नरेंद्र मोदींमध्ये प्रेरित करणारे नेतृत्वगुण (देवेंद्र फडणवीस)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड फोकस आहेत आणि चौफेर नजर असल्याने प्रत्येक गोष्टीची लहानातील लहान बाबही त्यांना माहीत असते. त्यांच्या कामाची पद्धत ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच ते रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यावर भर देतात. त्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीचा अनुभव आम्हाला अनेकदा आला आहे.

गेली १५ वर्षे नवी मुंबई विमानतळाचे काम मार्गी लागले नव्हते. याकरिता केंद्र सरकारकडून आठ एनओसी येणे बाकी होते. व्हिडिअो कॉन्फरन्सिंग घोषणा होताच १५ दिवसांत सात एनओसी मिळाले आणि उर्वरित एक एनओसी व्हिडिअो कॉन्फरन्सिंगनंतर एक आठवड्यात मिळाली. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे काम अखेर मार्गी लागले. याच प्रकारे मुंबई आणि राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पही मार्गी लागले.

पंतप्रधानांच्या या प्रगतीचे व्हिडिअो कॉन्फरन्सिंगच्या धर्तीवरच आम्ही राज्यात योजनांच्या पाठपुराव्यासाठी वॉर रूम सुरू केले. महिनोन््महिने निर्णय घ्यायचा नाही हे आता चालणार नाही. सर्व सचिवांनी एकत्र बसून काम करावे आणि योजनांचा पाठपुरावा करावा यासाठी वॉर रूम सुरू केले आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. मेट्रो-३ चे काम यामुळेच पूर्णत्वाकडे चालले आहे. वेगवेगळ्या एजन्सी असल्याने गेल्या पाच-सात वर्षांपासून याचे काम झाले नव्हते. मात्र वॉर रूममुळे काम मार्गी लागले. आपला फोकस, आपले कोऑर्डिनेशन आणि रिझल्ट ओरिएंटेशन असलेच पाहिजे हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

मोदी यांच्याकडे प्रचंड नेतृत्वगुण आहेत. नेतृत्व गुणात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुम्ही कोणाला तरी प्रेरित (इन्स्पायर) करावयास हवे. इन्स्पिरेशन खूपच महत्त्वाचे आहे. जनतेला इन्स्पायर करण्याची त्यांची जशी हातोटी आहे तशीच जगातील प्रेरित करण्याचे काैशल्यही त्यांच्यात आहे. त्याच्यानंतर उद्योगपतींसह वेगळ्या घटकांनाही ते नवी प्रेरणा देत असतात. याशिवाय अॅडमिनिस्ट्रेशनलाही नरेंद्र माेदी इन्स्पायर करतात. त्यांच्या नेतृत्वातील अाणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे नेत्याला कार्यक्रम देता आले पाहिजेत आणि त्याचे इम्प्लिमेंटेशनही करता आले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान हे याचे चांगले उदाहरण आहे. महात्मा गांधींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. जवळजवळ सगळ्यांनी स्वच्छतेबाबत सांगितले, आपण त्यांची नावे घेतली; परंतु स्वच्छता करू शकलो का? नाही. नरंेद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आणि आज देशात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली. नरेंद्र मोदी चांगले कम्युनिकेटर आहेत. त्यांना भारतीय मानसिकतेची चांगली जाणीव आहे. आपल्या देशात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. माेदी यांनी स्वच्छतेला उत्सवाचे स्वरूप दिले. त्यामुळे या अभियानात सगळे हिरिरीने भाग घेत आहेत.
मी महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे कार्यक्रम देऊन त्यांच्या इम्प्लिमेंटेशनवर भर दिला. जलयुक्त शिवारही यातूनच आलेली कल्पना. मी जलयुक्त शिवार घेऊन गावागावात फिरलो. जेव्हा मुख्यमंत्री एखादी योजना घेऊन गावागावात जातो तेव्हा लोकांना त्याचे महत्त्व पटते, अधिकाऱ्यांना महत्त्व कळते. नरेंद्र मोदी यांचा अधिकाऱ्यांवर असलेला प्रभाव यामुळेच निर्माण झाला आहे. कारण त्यांनी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले. आम्ही राज्यात अधिकाऱ्यांंसाठी केआरए तयार केले. गेल्या दोन वर्षांत बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी दिल्लीला विषय गेले की ते कोल्ड स्टोअरेजमध्ये जात असत. आता दिल्लीहून विषयांचा स्वतः पाठपुरावा केला जातोय. पटापट निर्णय होत आहेत. विरोधकांनी ६० वर्षांत जे केले नाही ते मोदी यांनी दोन वर्षात करून दाखवले. जनता मोदींच्या कामावर खूश आहे.
शब्दांकन : चंद्रकांत शिंदे
बातम्या आणखी आहेत...