आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवेंद्रांनी 5 वर्षांत कमावलेलं एका दिवसात गमावलं, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'भाजपने अगदी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू केले होते. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे चित्र पालटले. मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या पक्षाने तत्काळ इन कॅमेरा बहुमत सिद्ध करावे असे आदेश काेर्टाने दिले, त्यानंतर मात्र दावेदार नेत्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे आज महाविकास आघाडीला हा दिवस पाहायला मिळाला,' असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना व्यक्त केले. 'देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत जी राजकीय पत कमावली ती घाईगडबडीत शपथ घेऊन एका दिवसात गमावली. यात राज्याचे किती नुकसान झाले यापेक्षा फडणवीसांचे मोठे नुकसान झाले,' असेही ते म्हणाले.

भाजपने अगदी शेवटपर्यंत अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविकास आघाडीची घडी एवढी मजबूत होती की कोणीही त्यांच्या गळाला लागले नाही. गुरुवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, त्या नंतर इतर मंत्रिपदाचे वाटप हाेईल. ती कशी असतील या बाबतही नियाेजन झाले आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकसभेत ज्याप्रमाणे आवाजी किंवा गोपनीय मतदान हाेत नाही, ताेच नियम विधानसभेतही हवा. लोकशाहीच्या सभागृहात गोपनीय ही बाबच चुकीची आहे. आपल्या पक्षाचा आमदार कोणाला मत देतो आहे, हे त्या पक्षाच्या नेत्याला कळायलाच हवे. हे सभागृह जनतेच्या हितासाठी आहे. लाेकप्रतिनिधी तिथे जनतेची बाजू मांडतात मग गोपनीयता कशाला हवी, हेच न्यायालयानेही पुन्हा सांगितल्याचे चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील पाच वर्षे यशस्वीरीत्या काम करून राज्याला यशाच्या शिखरावर नेईल. भाजपला या पाच वर्षांत एकही संधी देणार नाही, असा निर्धारही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

दिल्लीच्या अनुभवाचा फायदा झाला

आमची याचिका उच्च न्यायालयात पाठवली असती तर कदाचित पेच अजूनही सुटला नसता. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हुकुमशाही पक्षाच्या विरोधात लोकशाही तग धरू शकली. केवळ माझ्या एकट्यामुळे नव्हे तर सर्वांच्या प्रयत्नांमुळेच हे घडू शकले. काँग्रेसमध्ये सर्वानुमते निर्णय घेतले जातात. दिल्लीतील राजकारणाचा अनुभव असल्यामुळे ती पद्धत माहिती हाेती, त्याचाच या प्रकरणात फायदा झाल्याचे चव्हाण म्हणाले. 'अजूनही भाजप काही आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतेय का?' या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, 'जोपर्यंत शपथविधी होऊन मंत्रिमंडळाचे वाटप हाेत नाही ताेपर्यंत आमदार एकत्रच राहतील.

बातम्या आणखी आहेत...