Home | Jeevan Mantra | Dharm | Devghar remains very good at the north-east of the house

घरामध्ये देवघर उत्तर-पूर्व दिशेला असणेच अत्यंत शुभ राहते, दक्षिण दिशेला चुकूनही असू नये देवघर

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 09, 2019, 12:10 AM IST

देवघराशी संबंधित या 6 गोष्टींकडे लक्ष दिल्यास लवकर फलदायी होऊ शकते पूजा

 • Devghar remains very good at the north-east of the house

  घरातील देवघराची मांडणी ही चुकीची असल्यास त्या घरातील व्यक्तींना विविध प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.


  - घरामध्ये देवघर उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते. हे शक्य नसल्यास पश्चिम दिशेला देवघर बनवू शकता परंतु दक्षिण दिशेला देवघर असू नये.


  - घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे.


  - घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.


  - घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.


  - घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.


  - शास्त्रानुसार खंडित(भंगलेल्या) मूर्तींची पूजा वर्ज्य मानली गेली आहे. खंडित झालेली मूर्ती देवघरातून काढून एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करावी.

Trending