आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 सप्टेंबरपासून देवी पूजेचा उत्सव सुरु, 7 ऑक्टोबरला महानवमी आणि 8 ला दसरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्री रविवार 29 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सोमवार 7 ऑक्टोबरला महानवमी आणि मंगळवार 8 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव साजरा केला जाईल. यावर्षी नवरात्रीमध्ये 6 दिवस विशेष योग जुळून येत आहेत. 2 दिवस अमृतसिद्धी, 2 दिवस सर्वार्थसिद्धी आणि 2 रवी योग यामुळे नवरात्रीमध्ये करण्यात आलेली देवी पूजा लवकर फलदायी होऊ शकते.

  • वर्षभरात येतात चार नवरात्री

एका वर्षामध्ये नवरात्र चार वेळेस येते. दोन गुप्त आणि दोन प्रकट नवरात्री असतात. माघ आणि आषाढ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. चैत्र मास आणि अश्विन मासामध्ये प्रकट नवरात्री असते. शारदीय नवरात्री म्हणजे अश्विन मासामध्ये येणाऱ्या नवरात्रीचे महत्त्व गृहस्थ साधकांसाठी अधिक असते. अनेक लोक देवीची मूर्ती घरामध्ये स्थापित करून नवरात्रीमध्ये सकाळ-संध्याकाळ विशेष पूजा करतात.

  • कोणत्या दिवशी जुळून येणार कोणता योग

ज्योतिषविद् अर्चना सरमंडल यांच्यानुसार 30 सप्टेंबरला अमृतसिद्धी योग राहील. 1 ऑक्टोबरला रवी योग, 2 तारखेला अमृतसिद्धी, 3 तारखेला सर्वार्थसिद्धी, 4-5 तारखेला रवी योग आणि 6 तारखेला सर्वार्थसिद्धी योग राहील.

  • कोणत्या दिवशी केली जाते कोणत्या देवीची पूजा

पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चांदघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी, नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते.

  • विजयादशमीला रवी योग

7 ऑक्टोबरला महानवमी 12.38 पर्यंत राहील. त्यानंतर वजयादशमी (दसरा) सुरु होईल. विजयादशमी 8 ऑक्टोबरला दुपारी 2.51 पर्यंत राहील. विजयादशमीच्या दिवशीसुद्धा रवी योग राहील. या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...