Home | Gossip | devid dhawan announces about 'collie no. 1' film remake with varun dhawan and sara ali khan

बर्थडे गिफ्ट : 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहेत वासु भगनानी-डेविड धवन, वरुण-साराला घेऊन बनवणार आहेत 'कुली नं. 1'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 24, 2019, 01:19 PM IST

'कुली नंबर 1'. फिल्मचे शूटिंग ऑगस्ट 2019 मध्ये सुरु होईल...

 • devid dhawan announces about 'collie no. 1' film remake with varun dhawan and sara ali khan

  बॉलिवूड डेस्क : वरुण धवन 24 एप्रिलला आपला 32 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. यादरम्यानच त्याचे वडिल डेविड धवन यांनी बर्थडे गिफ्ट देत फिल्म 'कुली नंबर 1' च्या रीमेकची घोषणा केली आहे. फिल्मसाठी 25 वर्षांनंतर वासु भगनानी आणि डेविड धवन यांची जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. वरुण धवनसोबत सारा अली खान या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत असेल.

  ऑगस्टपासून सुरु होईल शूटिंग...
  ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करून सांगितले की, 'जुड़वा-2 नंतर डेविड आणि वरुण धवन यांची जोडी पुन्हा सोबत काम करत आहे. यावेळी फिल्म आहे सुपरहिट कॉमेडी - 'कुली नंबर 1'. फिल्मचे शूटिंग ऑगस्ट 2019 मध्ये सुरु होईल.

  1995 मध्ये रिलीज झाली होती 'कुली नंबर 1'...
  'कुली नंबर 1' फिल्म 90 बाब दशकातील सुपरहिट कॉमेडी फिल्म होती. फिल्मचे लीड स्टार कास्टमध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर होते. 25 वर्षांपूर्वी ही फिल्म केवळ 3.5 कोटी रुपयांमध्ये बनून तयार झाली होती. जेव्हा की, फिल्मचे ओव्हर ऑल बॉक्स ऑफिस कलेक्शन 23 कोटी रुपये होते.

Trending