आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षीय बाळाच्या डोक्यावर उगवली शिंगे, सैतानाने जन्म घेतल्याचा लोकांचा दावा; पण डॉक्टरांनी सांगितले सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलीपाइन्स - फिलीपाइन्स मध्ये दोन वर्षाच्या बालकाची अवस्था पाहून लोक त्याची भूत-प्रेत आणि राक्षसासोबत तुलना करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, त्याच्यामध्ये सैतानाने प्रवेश केला आहे. येथे राहणाऱ्या सालोना कुटूंबात 2 वर्षांपू्र्वी क्लाइनचा जन्म झाला. जन्माच्यावेळी त्याच्या आईला त्याच्या डोक्यात भेग पडल्यासारखी दिसली. यामधून त्याच्या डोक्याचा काही भाग जलदगतीने बाहेर येत होता. पण डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन केल्यानंतर स्थिती आणखीनच बिघडली आणि मुलाच्या डोक्यावर राक्षसासारखी शिंगे उगवली. 

 

डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण
> डेली मेलीच्या रिपोर्टनमध्ये सांगितले की,.ऑपरेशननंतर मुलाचे डोके इतक्या वेगाने वाढले की डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी सांगितले की या बाळाला जन्मजात hydranencephaly नावाचा आजार झाला होता.

> या रोगामुळे मुलाच्या मेंदूचा विकास गर्भाशयातच थांबतो आणि उर्वरित ठिकाणी मेंदूच्या सेरेब्रोस्पाईनल फ्लुइड भरल्या जातात. ऑपरेशनद्वारे डॉक्टरांनी अतिरिक्त लिक्वीड काढून टाकले आहे. पण दुसऱ्या दिवशी ते लिक्वीड मेंदूच्या उर्वरित भागात पसरत बाहेर निघत असते. ज्यामुळे मुलाच्या डोक्यावर शिंग उभे राहतात.

 

जीव वाचविण्यासाठी ऑपरेशनची आवश्यकता 

> डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डोक्यात सेरेब्रोस्पाईनल फ्लुइड अस्थिर झाले आहे. यामुळे त्याचे डोके फुटण्याची भीती आहे. म्हणूनच, ऑपरेशनद्वारे शक्य तितक्या लवकर सेरेब्रोस्पाईनल फ्लुइड काढावा लागणार आहे. तेव्हाच त्याचे डोके पुन्हा पहिल्या आकारात आणता येईल. पण क्लाइनच्या आईला भीती आहे की, दुसऱ्या ऑपरेशनसाठी तिचे बाळ खूपच नाजूक आहे.

बातम्या आणखी आहेत...