बिग बॉस 13 / आजारपणामुळे देवोलिना भट्टाचार्जीला यावे लागले बाहेर, हॉस्पिटलमध्ये झाली अॅडमिट

या आठवड्यात शोमध्ये नाही होणार एलिमिनेशन

Dec 01,2019 10:40:00 AM IST

टीव्ही डेस्क : 'बिग बॉस 13' सध्या घरात होत असलेली भांडणे आणि वादांमुळे चर्चेत आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोमध्ये दररोज ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याचदरम्यान अशी बातमी येत आहे की, कन्टेस्टंट देवोलिना भट्टाचार्जीला शोमधून बाहेर यावे लागले आहे.

आजारपणामुळे देवोलिनाने सोडला शो...

देवोलिना काही दिवसांपासून आजारी आहे. ज्यामुळे ती शोचे टास्क आणि घरातील कामांमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीये. अशात देवोलिना काही दिवसांसाठी घरातून बाहेर आली आहे. ती शोमधून बाहेर झालेली नाही आणि ठीक झाल्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परत येणार आहे. सध्या बाहेर येऊन देवोलिना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली आहे. उपचार घेत आहे. तिची 2017 मध्ये एक बॅक सर्जरीदेखील झालेली आहे.

या आठवड्यात नाही होणार एलिमिनेशन...

देवोलिना बाहेर गेल्यामुळे मेकर्सने घोषणा केली आहे की, या आठवड्यात घरातून कुणीही एलिमिनेट होणार नाही. देवोलिनाचे शोमधे रश्मी देसाईसोबत चांगले बॉन्डिंग दिसते. दोघी आधीपासूनच खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. रश्मी घरात देवोलिनाची खूप काळजी घेताना दिसत होती. मागच्या आठवड्यात जेव्हा सलमानने असेच म्हणाले होते की, आरती सिंह आणि देवोलिना शोमधून बाहेर झाल्या आहेत तर रश्मी चक्क रडली होती.

X