आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान विष्णूंना कशामुळे तुळशीने दिला होता शाप?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 19 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे. या दिवशी तुळशी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. या एकादशीला तुळशीचे शाळीग्रामसोबत लग्न लावले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नेपाळमध्ये वाहणारी गंडकी नदीसुद्धा तुळशीचे एक स्वरूप आहे. या संदर्भात शास्त्रामध्ये एक कथा सांगण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, गंडकी नदीविषयी खास गोष्टी...


तुळस झाली गंडकी नदी
शिवपुराणानुसार, प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक राक्षस होता. त्याची पत्नी तुळसी खूप तेजस्वी आणि सुंदर होती. ती पतिव्रता असल्याने शंखचूड याचा वध करणे अशक्य बनले होते. जेव्हा शंखचूड याचे भगवान महादेवाशी युद्ध सुरू झाले, त्यावेळी भगवान विष्णूंनी शंखचुडाचे रूप धारण केले आणि तुळशीचे पतिव्रत भंग केले. यामुळे शंखचुडाचा वध करणे शक्य झाले. तुळशीला हे समजले तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला. विष्णूंनी हा शाप स्वीकारला आणि सांगितले की, पृथ्वीवर तू गंडकी नदी आणि तुळशीचे रोपटे स्वरुपात राहशील.


या नदीमध्ये मिळतात शाळीग्राम
गंडकी नदीमध्ये एक विशेष प्रकारचे दगड आढळतात. यावर चक्र, गदा इ चिन्ह असतात. धर्म ग्रंथानुसार हेच दगड भगवान विष्णूंचे स्वरूप आहेत. यांनाच शाळीग्राम शीला म्हटले जाते. शिवपुराणानुसार, भगवान विष्णू यांनी स्वतः सांगितले होते की, गंडकी नदीमध्ये माझा वास राहील. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीष्ण दातांनी नदीमधील दगडांवर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील आणि याच कारणामुळे या दगडांना माझे स्वरूप मानून यांची पूजा केली जाईल.


पुढे जाणून घ्या, गंडकी नदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...