आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घरातही तुळस असल्यास 19 नोव्हेंबरला लक्षात ठेवा या 6 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 19 नोव्हेंबर 2018 ला तुळशी विवाह, देवउठनी म्हणजे देव प्रबोधिनी एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. तुळशीचे लग्न शाळीग्राम (श्रीविष्णूंचे स्वरूप)सोबत केले जाते. मान्यतेनुसार प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णू झोपेतून जागे होतात. ही देव उठण्याची तिथी असल्यामुळे याला देवउठनी एकादशी म्हणतात.


1. सोमवारी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि वस्त्र अर्पण करावेत. यासोबतच सौभाग्य सामग्रीही अर्पण करावी. दुसऱ्या दिवशी एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्य सामग्री दान करावी.


2. सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत, कारण शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीचे पाने तोडणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. अमावस्या, चतुर्दशी तिथीला तुळशीची पाने तोडू नयेत. रविवार, शुक्रवार आणि सप्तमी तिथीलाही तुळशीची पाने तोडू नयेत.


3. विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत. वर्ज्य सांगण्यात आलेल्या दिवसांमध्ये तुळशीच्या पानांचे काम असल्यास गळून पडलेली पाने घेऊ शकता. वर्जित करण्यात आलेल्या तिथीच्या एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवू शकता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...