आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंगांच्या जागृतीसाठी उत्साहात धावले शहरातील दिव्यांग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - नवजीवन सोसायटी फॉर रिहॅबिलिटी टेशन ऑफ मेंटली रिटायर्ड सरस्वती भुवन शिक्षण संस्था, ब्लक्स, बक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (६ जानेवारी) अपंगांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले होते.  या दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक हजार दिव्यांगांनी उत्साहात सहभाग घेतला.  यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, बौद्धिक अक्षमता असलेले अंध प्रवर्गाचे दिव्यांगांचा समावेश होता.   


औरंगाबादमधील विहंग, स्वयंमसिध्द, आयकॉन, आयप्रोग्रेस, आरंभ ऑटीझम सेंटर, श्रुतीवाणी विकास केंद्र, बाहेती अंध विद्यालय, उत्कर्ष, यलो स्कूल, असिसी आशा निकेतन, औरंगाबाद पब्लिक स्कूल, मार्ग संस्था, नवजीवन शाळा व कार्यशाळा, वसतिगृह, विशेष शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे दिव्यांग तसेच इतरांची उपस्थिती होती.  मातोश्री वृध्दाश्रममधील ज्येष्ठ नागरिकांनीही यात सहभाग घेतला.

 

सुरुवातीला अपंग पुनर्वसनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.  यानंतर प्रीती भानुशाली यांनी वार्म अप सत्र केले. या प्रकल्पासाठी व्यवस्थापकीय संचालिका शर्मिला गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच संस्थेच्या अध्यक्षा नलिनीताई शहा, सचिव रामदास आंबुलगेकर, केशवराव देशपांडे, जयाताई केंद्रेकर, नवजीवन पालक संघाच्या अध्यक्ष बी.एम.राठी हे उपस्थित होते. ओंकार वैद्य व प्रकल्पाचे आयोजक  आनंद कुलकर्णी, स्मिता भारतीय,मसीहाचे किशोर राठी, श्री. राजपाल, दिव्या रायठठा, मोहन नायर आदी उपस्थित होते.