आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांचा मान भारतीयांनीच राखावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरमध्ये झालेली दंगल, जाळपोळ असो की दिल्लीमध्ये झालेले निर्भयाकांड अथवा देवयानी खोब्रागडे प्रकरण, या सर्वांमुळे जगात भारताविषयी चुकीचा संदेश जातो आहे. निश्चितच त्यामुळे अमेरिकेसह इतर देशांना भारताच्या प्रकरणांमध्ये लुडबुड करण्याची आयती संधी मिळत आहे! त्यांची मजल आता भारताच्या राजनैतिक देवयानी खोब्रागडेंना अटक करण्यापर्यंत गेली. हे निश्चितच अयोग्य आहे. मुळात आपल्याकडे घरातील मजुरांना चांगली वागणूक दिली जात नाही, हे उघड आहे ! काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत बसपाचे खासदार धनंजय सिंहच्या ‘उच्चशिक्षित’ डॉक्टर पत्नीने रागाच्या भरात आपल्या महिला नोकराची हत्या केली. तसेच काही महिन्यांपूर्वी एका राजनैतिक अधिकार्‍याने आपल्या पत्नीला विदेशात आपल्या घरात तेथील जागरूक पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करेपर्यंत बेदम मारले! हे असे प्रकार टाळता येऊ शकतात. विदेशात राहताना आपले वर्तन जबाबदार भारतीयासारखेच असले पाहिजे. राहता राहिला प्रश्न ‘फितूर बुद्धिमंत’ लेखाचा; तर लेखकाने सांगावे की, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाच नामंजूर करणार्‍या अमेरिकेबद्दल तुमचे काय मत आहे?

( इ मेलद्वारे प्रतिसाद)