Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Dewarwadi's teacher drowning in the farmland: Due to the clogging, suddenly came to light

दावरवाडीच्या शिक्षकाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू: छिद्रे बुजवतांना अचानक गेला तोल

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 09:51 AM IST

महाविद्यालयात इतिहास व मराठीचे प्राध्यापक म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते.

  • Dewarwadi's teacher drowning in the farmland: Due to the clogging, suddenly came to light

    पाचोड - शेततळ्यातील पानकापडास पडलेल्या छिद्रे बुजवण्याचे काम करताना अचानक पाय घसरुन तोल गेल्यामुळे शेततळ्यात बुडून शिक्षकांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गणेश काकासाहेब रंध (३३, रा. दावरवाडी ता. पैठण) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक गणेश रंधे हे थेरगाव ( ता. पैठण) येथील विना अनुदानित त्रिंबकदास पटेल महाविद्यालयात इतिहास व मराठीचे प्राध्यापक म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते.

    शिकवणीसह ते कुटुंबाला हात्तभर लागावा म्हणून शेतीही करायचे. दावरवाडीजवळील दादेगाव हजारे शिवारातील स्वतःच्या शेतात शेततळा उभारलेला आहे. शेततळ्यावरील पानकापडला पडलेले छिद्रे बुजवण्यासाठी तुळशीराम भवरे यांना सोबत घेऊन छिद्रे बुजवण्याचे काम करताना अचानक शिक्षक रंधे यांचा तोल जावून ते शेततळ्यात पडले. शेततळ्यात पंधरा फुटापर्यंत पाणी होते. त्यात शिक्षक रंधे यांना पोहता येत नसल्यामुळे शेततळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. रंधे शेततळ्यात पडताच भवरे यांनी आरडाओरड केल्यानंतर आसपासचे शेतकरी, शेतमजूर घटनास्थळी धावून आले व पाण्यात पडलेल्या शिक्षकास बाहेर काढून ताताडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    परंतु वैद्यकीय अधिकारी डाँ.काशीनाथ स्वामी यांनी तपासून त्यास मृत्यू घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शिक्षक रंधे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे.या घटनेने दावरवाडी परिसरात शोककळा पसरली.

Trending