आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजीपी कार्यालयातील हवालदारांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रशिक्षण; असे कोणते आणि कशाचे प्रशिक्षण घेताहेत राजस्थानचे पोलिस ?  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- पोलिस विभागातील जवानांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु राजस्थानातील काही हवालदारांना एक नवे प्रशिक्षण मिळत आहे. या जवानांना आता अधिकाऱ्यांकडे येणाऱ्या पाहुण्यांना चहा, कॉफी व जेवण वाढण्याबरोबरच वेगवेगळे पक्वान्न तयार करण्याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. डीजीपी कपिल गर्ग यांच्या कार्यालयात तैनात जवानांना शहरातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

सध्या डीजीपी कार्यालयाद्वारे प्रशिक्षणासाठी हवालदार पूरणमल यांना पाठवण्यात आले आहे. हॉटेलमध्ये तीन वेगवेगळे रेस्तराँ व बार आहेत. 


अधिकाऱ्यांकडे आलेल्या पाहुण्यांना चहा-कॉफी व जेवण कशा प्रकारे द्यावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर हवालदार बगाराम यांना पाठवण्यात येईल. हॉटेल ललितमध्ये जाऊन दिव्य मराठी नेटवर्क प्रतिनिधीने पूरणमलची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. तेथे तो किचनमध्ये नामवंत शेफसोबत पक्वान्न तयार करण्यापासून रेस्तराँमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना जेवण देण्याचे प्रशिक्षण घेत होता. हॉटेलात मार्केटिंग-कम्युनिकेशन मॅनेजर अजिम खान यांंनी सांगितले, पोलिसांतील एका जवानास एक्झिक्युटिव्ह शेफ शैलेश वर्माकडून प्रशिक्षण दिले जात आहे. ते रेस्तराँमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना जेवण वाढतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्वान्न तयार करण्याचे शिकतात. पूरणमल यांना २८ डिसेंबर रोजी प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्यांचे प्रशिक्षण २८ जानेवारीपर्यंत चालेल. यानंतर बेगारामला एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भात बोलताना निवृत्त डीजी रामजीवन मीणा यांनी सांगितले, हवालदारांना हॉटेलमध्ये पाठवून जेवण तयार करण्यापासून वाढप्याचे काम करण्याचा निर्णय चुकीचा आहे. तो हवालदार म्हणून पोलिस दलात रुजू झाला. त्याला हॉटेलात प्रत्येक टेबलवर फिरवणे किती योग्य आहे? असे ते म्हणाले. 
 

बातम्या आणखी आहेत...