आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DGP's Claim That Sridevi Was Killed, Boney Kapoor Said, 'I Do Not Want To Say Anything On Such Stories ...'

डीजीपीचा दावा श्रीदेवी यांचा झाला होता मर्डर, बोनी कपूर म्हणाले - 'मला अशा कथांवर काहीही बोलायचे नाही...' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने सर्वानाच हैराण केले होते. त्यांच्या मृत्यूच्या दीड वर्षानंतर केरळचे डीजीपी ऋषिराज सिंहनेदेखील हैराण करणारा दावा केला आहे. सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नव्हे तर मर्डर होता. त्यांनी हा दावा फॉरेसिक एक्सपर्ट आणि त्यान्चे चांगले मित्र डॉ. उमादथन यांचा उल्लेख करून दिला आहे. डीजीपीच्या या वक्तव्यामुळे श्रीदेवीचे पती आणि फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

 

डीजीपीने श्रीदेवी यांच्या म्रुत्युला मर्डर म्हणाल्याचे वक्तव्यावर बोनी कपूर म्हणाले, 'मी अशा मूर्खतापूर्ण गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मला नाही वाटत की, अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. कारण अशा मूर्खतापूर्ण कहाण्या समोर येत राहतात. तसे पाहायला गेले तर अशा गोष्टी कुणाच्या कल्पनेतच असतात.' 

 

मित्राचे नाव घेऊन डीजीपीने केला श्रीदेवी यांच्या हत्येचा दावा... 
उमादथन यांचे बुधवारी 73 वर्षे वयात निधन झाले. त्यांना केरळमध्ये मर्डर मिस्ट्री केस सोडवण्यासाठी ओळखले जायचे. मित्राच्या निधनाच्यावेळी डीजीपीने एका लोकल वृत्तपत्रासाठी एक नोट लिहिली. या नोटमध्ये त्यांनी उमादथनसोबत श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल चर्चा झाल्याचा उल्लेख केला. सिंहने सांगितले, 'मी जिज्ञासापूर्वक उमादथन यांच्याशी श्रीदेवीच्या केसबद्दल बोललो होतो. त्यांच्या उत्तराने मला हैराण करून सोडले होते. ते म्हणाले होते की, ते या पूर्ण प्रकरणाला खूप जवळउन बघत होते. रिसर्चड्रमायन त्यांना या गीष्टीची पूर्ण शक्यता दिसली की, श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर मर्डर आहे. यादरम्यान त्यांना असे अनेक पुरावे मिळाले की, श्रीदेवींची हत्या करण्यात आली होती.'

 

त्यांनी पुढे लिहिले, 'माझ्या मित्राने सांगितले की, कोणतीही नशेत असलेली व्यक्ती कोणत्याच परिस्थितीत एक फुट खोल बाथटबमध्ये बुडू शकत नाही. माझ्या मित्राने दावा केला होता की, कुणीतरी अभिनेत्रींचे पाय पकडले असतील आणि त्यांचे डोके धावून त्यांना पाण्यात बुडवले असेल.'

 

दुबई पोलिसांनी केली प्रकरणाची सखोल तपासणी... 
मागच्यावर्षी 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, नशेत असलेल्या अभिनेत्रीचा बाथटबमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला. दुबई पोलिसांनी खूप सखोल तपस केला पण त्यांना मर्डर झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही, त्यानंतर त्यांचा मृत्यू अपघात मानला गेला. 

 

लीबिया सरकारचे मेडिको-लीगल कन्सलटंट होते उमादथन...  
डॉ. उमादथनबद्दल बोलायचे तर ते राज्य थ‌िरुवनंतपुरम, अल्पापुझा, कोट्टयम, त्रिशूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेंसिक मेडिसिन प्रोफेसर म्हणून काम करायचे. त्यांना लीबिया सरकारने आपले मेडिको-लीगल कन्सलटंट म्हणूनदेखील निवडले होते. केरळ पोलिसांनी अनेक मर्डर केस सोडवण्यासाठी त्यांची मदत घेतली होती.