आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने रिंगणात, पहिल्यांदाच लढवणार लोकसभेची निवडणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई -  लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला असून सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. शिवसेना महाराष्ट्रात 23 लढवणार असून त्यापैकी 21 जागांची यादी आज जाहिर केली. सातारा आणि पालघर या दोन मतदार संघाच्या जागा शिवसेनेने अजून जाहिर केल्या नाहीत. शिवसेना हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांच्याविरोधात धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवणार आहे.  

 

धैर्यशील माने यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. मात्र त्यांची राजकीय पार्श्वभूमी दांडगी आहे. माने यांचे आजोबा 5 वेळेस खासदार होते. तर आई  दोन वेळेस राष्ट्रवादीच्या खासदार होत्या. 
 

 

धैर्यशील मानेंचा परिचय 

> धैर्यशील माने हे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत.
> नोव्हेंबर 2018 मध्ये माय-लेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
> रुकडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीपासून धैर्यशील यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात. 
> पट्टणकोडोली आणि आलास मतदारसंघातून जिल्हा परिषदेत ठेवले पाऊल. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्ष काम केले. 
> त्यानंतर माने गट टिकवण्यासाठी प्रयत्न केला, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला.
> यानंतर त्यांच्या आई निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये शिवसेनेची वाट धरली. 
> माने गटाने पूर्वीच्या इचलकरंजी आणि सध्याच्या हातकणंगले मतदारसंघाचे तब्बल 35 वर्षे नेतृत्व केले.
> धैर्यशील यांचे आजोबा बाळासाहेब माने पाच वेळा खासदार होते तर आई निवेदिता माने राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा खासदार होत्या.

बातम्या आणखी आहेत...