आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धैर्यशील माने यांचा नवा कोल्हापूी पॅटर्न; विजयानंतर राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचा घेता आशीर्वाद...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळीकडे मंत्रिमंडळाची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांनी राजकारणातल्या मोठ्या नेत्यांना पराभूत केले. त्यात हातकणंगलेमध्येही नवख्या धैर्यशील माने यांनी मात्तबर राजू शेट्टी यांना पराभव दाखवला. पण आता याच कोल्हापूरमध्ये चकित आणि सुखद अशी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूरात राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न पाहायला मिळाला. शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतला.


खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलाच, शिवाय त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वादही घेतले. यावेळी राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांचे औक्षणही केले. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहूदे सर्वकाही चांगले होईल, असे धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले.

 

यावर माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसे तुम्हीही लोकांना धरुन राहा असा आशीवार्द राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात लढत झाली. राजू शेट्टी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात होते, तर धैर्यशील माने शिवसेनेच्या तिकीटावर युतीकडून लढत होते. यात धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. राजू शेट्टी मोठे नेते असल्याने सर्वाचेंच लक्ष या मतदारसंघाकडे होते. राजू शेट्टी यांच्या पराभवाने धैर्यशील माने हे नाव देशभर गाजले आहे. पण आता धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत, राजकारणाच्या पलिकडे जात थेट राजू शेट्टी यांचे घर गाठून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला.

बातम्या आणखी आहेत...