Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Dhan Prapti che Upay

धन प्राप्तीचे 4 उपाय : घराच्या उत्तर-पूर्व दिशेला जमिनीत करा हा एक उपाय

रिलिजन डेस्क | Update - Aug 07, 2018, 12:32 PM IST

अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. घरामध्ये पैशांची कमी राहते.

 • Dhan Prapti che Upay

  अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. घरामध्ये पैशांची कमी राहते. ज्योतिषीय मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कुंडलीतील दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची विशेष पूजा करावी. येथे जाणून घ्या, धनलाभ करून देणारे काही खास उपाय...


  पहिला उपाय
  रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी. पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावी. त्यानंतर श्री महालक्ष्मयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. मंत्र जप करणे शक्य नसल्यास 108 वेळेस ऐकावा. हा उपाय पती-पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. मंत्र जप करण्यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.


  दुसरा उपाय
  घर बांधताना प्लॉटच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेल्या नाग-नागिणीची जोडी पुरून टाकावी. घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नाग-नागिणीची जोडी एका कलशात लपवून ठेवा. या उपायाने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते.


  तिसरा उपाय
  स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन महालक्ष्मीच्या - ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. या मंत्राने मोठमोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात.


  चौथा उपाय
  धन लाभाची इच्छा असल्यास रोज संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा लावावा. ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा जप करावा. या उपायानेसुद्धा गरिबीचे योग दूर होऊ शकतात.

Trending