आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलणे इतुके लागले जिव्हारी, की अश्रूंची वाट धरी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह व्यक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उद्विग्न अवस्थेत धनंजय मुंडे यांनी  रविवारी पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. १७ तारखेला मी विड्यात केलेल्या भाषणाची क्लिप एडिट करून आम्हा बहीण-भावाच्या नात्यात काही जण विष कालवण्याचे काम करत आहेत. या प्रकाराने  मी जगावं की मरावं या मन:स्थितीत आहे, असे सांगत मुंडे यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. मी एकही शब्द चुकीचा बोललो नाही, चूक असेल तर फाशी घेईन, असेही ते म्हणाले. यापूर्वी दोन भावांमध्ये विष पेरून त्यांना वेगळे करण्यात आले. आता आमच्यातही विष पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात मला केवळ खलनायक दाखवले जात आहे. आमच्या नात्यात कोण विष कालवत आहे, याचा शोध घेणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

आजपर्यंत मी १५०० बहिणींचं कन्यादान केलं. राजकीय विरोध असला तरी माझ्या त्या रक्ताच्या बहिणी आहे. त्यांच्याबाबत मी असं कसं बोलू शकतो? आम्ही एकाच घरात वाढलो, त्या घरातील महिलांनी मला घास भरवला आहे. मी त्यांच्याच विषयी असे बोलूच शकणार नाही, असे मुंडे म्हणाले. काही जण मला संपवण्याचा, खलनायक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला राजकारण करण्याचा अधिकार नाही का? इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करण्याची गरज काय? निवडणूक लढवू नको असे स्पष्ट सांगितले असते तरी मी माघार घेतली असती, असेही मुंडे म्हणाले. मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत मातीची शपथ घेत बहिणीला काही वाईट बोललो नसल्याची आणि त्याची सत्यता तपासण्याची विनंती केली. मायबाप जनताच माझा न्यायनिवाडा करेल, असे म्हणत त्यांनी लोकांना सत्याच्या बाजूने विचार करायला सांगितले.
 

... अन् मुंडेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली
> भाजपमध्ये आलेले “नवीन भाऊ’ आमच्या नात्यात फूट पाडत आहेत.
> मलाही तीन मुली आहेत. ज्या घरात इतक्या महिला आहेत त्या घरात बहिणीबद्दल मी असे कसे बोलेन?
> मलाही तीन मुली आहेत. ज्या घरात इतक्या महिला आहेत त्या घरात बहिणीबद्दल मी असे कसे बोलेन?​​​​​​​

धनंजय मुंडेंच्या पीएची तक्रार, अज्ञातावर गुन्हा
दरम्यान, या प्रकरणी परळी शहर पोलिसांत धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकाने तक्रार दिली असून धनंजय मुंडेंच्या व्हिडिओची छेडछाड करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


भाऊच जर असे बोलत असेल तर राजकारणच नको... खा. डॉ. प्रीतम मुंडे झाल्या पत्रकार परिषदेत भाव
ुक
आमच्या भावानेच अशा शब्दांत वाईट बोलावे याचेच जास्त दुःख होते. भाऊच जर असे आरोप करीत असेल तर राजकारण नको, असे भावनिक प्रतिपादन खासदार डाॅ. प्रीतम मुंडे केले. धनंजय मुंडे यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी यशश्री बंगल्यावर तालुक्यातून महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. या वेळी पंकजा व डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. भेटण्यासाठी आलेल्या महिलांनी पंकजा यांना “ताई, तुम्ही ताठ मानेने जगा’ असे सांगत पाठबळ दिले. 
 

परळीत नारीशक्तीचा मूकमोर्चा :
परळी-शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रविवारी मूकमोर्चा काढला. शहरातील शिवाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा बसस्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, मार्केट कमिटी, मोंढा, राणी लक्ष्मीबाई टावर, नेहरू चौक, पोलिस स्टेशन मार्गे वैद्यनाथ मंदिर येथे पोहोचला. प्रशासनाकडे कोणतीही मागणी न करता थेट प्रभू वैद्यनाथाकडे साकडे घालण्याचा निर्णय महिलांनी घेतला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. वाईट प्रवृत्तीपासून पंकजा मुंडे यांचे रक्षण करून यातून सावरण्याची त्यांना शक्ती दे, असे साकडे महिलांनी प्रभू वैद्यनाथाला घातले.