आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताई, १० वर्षांपूर्वी मला ताटावरून उठवलं; आता तुम्हीच मला राक्षस म्हणता : धनंजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - ‘प्रचारात माझ्या बहिणीने माझा राक्षस म्हणून उल्लेख केला. या राक्षसाचा नायनाट करीन असेही त्या म्हणतात. ताई, मी असे काय केले की तुम्हाला मी राक्षस वाटताे. १० वर्षांपूर्वी भरल्या ताटावरून तुम्ही मला उठवलंत. मीही बाजूला सरकलाे, तुम्हाला निवडून आणलं म्हणून मी राक्षस आहे का?’ अशा शब्दांत बहीण पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे परळीतील उमेदवार धनंजय मुंडे यांना स्टेजवरच रडू काेसळले. आज मुंडेसाहेब नाहीत, माझे वडीलही हयात नाहीत. मला जनतेशिवाय काेणी नाही, मला मायेचे पांघरूण घाला,’ अशी भावनिक साद त्यांनी मतदारांना घातली.
 

बातम्या आणखी आहेत...