आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं या', पंतप्रधानांना धनंजय मुंडेंचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात प्रचारसभा घेत आहेत. त्यांची उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला बीडमधील परळी येथे सभा होणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वीच परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंनी एक ट्वीट करुन आपली ही इच्छा व्यक्त केली, त्यात त्यांनी मोदींना हेलिकॉप्टरऐवजी परळी-अंबाजोगाई रस्त्याने येण्याची विनंती केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची परळीमध्ये प्रचारसभा होत आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहीले की, "मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत! एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास' दिसेल. चंद्रयान-2 मोहिमेदरम्यान तुम्ही 4 तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा !