आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिल पंडीत अण्णा मुंडे आणि काका गोपिनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने धनंजय मुंडेंनी केली नव्या इनिंगची सुरुवात

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1995 मध्ये गोपीनाथ मुंडेंसोबत केली होती राजकीय कारकीर्दीला सुरुवात
 • जुलै 2013 मध्ये केला राष्ट्रवादीत प्रवेश
 • अशी आहे धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द

मुंबई - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुडेंचीही वर्णी लागली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. राजकीय जीवनातील एका नव्या जबाबदारीची सुरुवात आज धनंजय मुंडे यांनी आपले वडील स्व. पंडितअण्णा मुंडे, काका स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे , संतश्रेष्ठ भगवान बाबा व मातोश्रीचे आशीर्वाद घेऊन केली.यापूर्वी धनंजय मुंडे विधानपरिषदेवर निवडून आले होते. मात्र यावेळी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडेंनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांची आता मंत्रिमंडळात वर्षी लागली आहे. धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. 

धनंजय पंडितराव मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण परळी येथील न्यु इंग्लिश स्कुलमधून पूर्ण केले. यानंतर शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय, परळी आणि सिम्बॉयसीस कॉलेज, पुणे येथून आपले महाविद्यालयीन पूर्ण केले. धनंजय मुंडेंनी बी.एस.एल. (बॅचलर ऑफ सोशल लॉ) ची पदवी घेतलेली आहे. धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द

 • धनंजय मुंडेंनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
 • भाजप विद्यार्थी आघाडी प्रमुख, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष काम केले. भारतीय जनता पार्टीत काम करताना विविध यात्रा, कार्यक्रमांचे आयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.
 • बेरोजगारांच्या प्रश्नांवर दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे येथे भव्य मोर्चांचे आयोजन व नेतृत्व.
 • सन 2001 बेरोजगारी व दहशतवाद या विरोधात पाच लाख युवकांचा मोर्चा काढण्यात पुढाकार.
 • 9 ऑगस्ट 2008 :- भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या युवा क्रांती रॅलीत महाराष्ट्रातील 15 हजार युवकांचे नेतृत्व.
 • मार्च 2009 :- युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली.
 • बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणुन 9 वर्ष, उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्ष आणि गटनेते म्हणून अडीच वर्ष काम पाहिले.
 • सन 2003 :- केंद्र सरकारच्या क्रिडा मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथे आयोजीत अ‍ॅफ्रो एशियन गेम्सच्यासंयोजन समितीवर निवड.
 • सन 2002 ते 2010 :- पट्टीवडगाव या आपल्या जि.प. गटात 8 वर्षात शंभर कोटींची विकास कामे करून हा गट विकासाच्या बाबतीत राज्यात आघाडीवर नेला.
 • सन 2007 ते 2010 - बीड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून काम करतांना जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयांचा विकास निधी आणून विविध विकास कामे केली. यात पंतप्रधान ग्रामसडक योजना, पाणी पुरवठा योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध केला.
 • 10 जुन 2010 :- महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवड.
 • जुलै 2013 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
 • 02 जुलै 2013 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर दुसर्‍यांदा निवड
 • 22 डिसेंबर 2014 :- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड
 • 10 जून 2016 :- महाराष्ट्र विधान परिषदेवर तिसर्‍यांदा निवड
 • 10 जून 2016 :- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी दुसर्‍यांदा निवड
 • ऑक्टोंबर 2019 :- परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून 32 हजार मतांनी विजय.

पुरस्कार 


धनंजय मुंडेना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात सन 2017 मध्ये दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. सन 2018 मध्ये दैनिक लोकमतचा पॉवरफुल राजकारणी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  होते. तसेच सन 2019 मध्ये नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार देण्यात आला होता.