आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद, गरीब रुग्णांना दिलासा देण्याची धनंजय मुंडेंची राज्यपालांना विनंती  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. 
धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा' अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.
मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.शेतकरी वाऱ्यावर, माहिती विभागाची टूर निघाली इस्रायलला; धनंजय मुंडेंनी घेतली हरकत!


राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असून सततचा दुष्काळ व त्यानंतर आता अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाऱ्यांचा परदेश दौरा व त्यावर होणारी उधळपट्टीवर धनंजय मुंडेंनी हरकत घेतली आहे. मुंडे यांनी हा दौरा रद्द करावा अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. 
एकीकडे सत्ता स्थापनेचा गुंता वाढल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात अगोदरच राज्यभरात शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक ओल्या दुष्काळाने गेले आहे. या अस्थिर परिस्थितीत अगोदरच डबघाईला आलेल्या माहिती व जनसंपर्क विभागातील 2 संचालक व 5 वरिष्ठ अधिकारी अभ्यास दौऱ्याचे कारण देत इस्रायल दौऱ्यावर निघाले असून या अधिकाऱ्यांपैकी काही जणांवर न्यायालयात प्रलंबित खटले आहेत तर काही जण परिविक्षाधीन कालावधीत सेवेत आहेत. 
राज्यात माहिती व जनसंपर्क हा विभाग नेहमी मुख्यमंत्री यांच्या अधिपत्यात राहिलेला आहे. शासनाच्या योजना व नवनवीन उपक्रम इत्यादींची माहिती जनतेपर्यंत पोचवणे ही मुख्य जबाबदारी असलेला माहिती जनसंपर्क हा अत्यंत महत्वाचा विभाग मानला जातो. असे असताना राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती व राजकीय अस्थैर्य पाहता नियम धाब्यावर बसवून अभ्यास दौऱ्याचे नाव करून लाखो रुपयांची  उधळपट्टी करत इस्रायल दौरा करणे उचित व संयुक्तिक आहे का असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे हा दौरा रद्द करावा अशी मागणीही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...