आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे भावा-बहिणीत आणखी एका वादाची ठिणगी,\'बेबी केअर किट\' नवजात अर्भकांच्या आयोग्यासाठी धोकादायक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या भावा-बहिणीत आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. ती म्हणजे, महिला व बालकल्याण विभागाची 'बेबी केअर किट' योजनेला तातडीने स्थगिती देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

नवजात अर्भकांसाठी 'बेबी केअर कीट' खरेदी व्यवहारात अनेक गंभीर त्रुटी आहेत. तसेच अर्भकांच्या आरोग्यासाठी हे कीट अत्यंत धोकादायक असून  ही योजना म्हणजे ठेकेदारांच्या हितास्तव खटाटोप असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. महिला व बालकल्यास विभागामार्फत नाही तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 

भ्रष्ट ठेकेदार करून घेत आहेत आर्थिक फायदा

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बेबी केअर किट योजना स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत युनीसेफचा सल्ला न घेता महिला व बालविकास विभागामार्फत नवजात अर्भकांसाठी 'बेबी केअर कीट' खरेदी केले जात आहे. परंतु अनेक भ्रष्ट ठेकेदार यात आपला आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 

जनहिताच्या योजनांचे स्वागतच, पण...

बालमृत्यू रोखणे व त्यासाठी विविध उपाययोजणा करणे, हा कोणत्याही सरकारसाठी प्राधान्याचा विषय असायला हवा, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. अशा उपाययोजनांचे सर्वच स्तरातून स्वागत होत असते. परंतु अशा योजना, विशेषत: वैयक्तिक लाभाच्या योजना तयार करण्यापूर्वी त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्था, कार्यकर्ते, विशेषज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून सर्वकष अभ्यासाअंतीच योजना अंमित केली पाहिजे, असे सर्वसाधारण संकेत आहेत. मात्र, विषयांकित योजनेच्या बाबतीत या प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे.

 

ग्रामविकास विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या अनेक ठेकेदाराभिमुख योजनांमधील दोष, अनियमितता व गैरव्यवहार मी यापूर्वीही सभागृहात उघडकीस आणले आहेत. विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील बचत गटांमार्फत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची योजना विभागाने आखली होती. ही योजना ठेकेदारांनी तयार केली असल्याचे अभ्यासाअंती लक्षात आल्यामुळे या योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच या प्रक्रियेत राज्यात कुप्रसिद्ध ठरलेल्या चिक्की घोटाळ्यातील एक ठेकेदार पात्र होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील बचत गटांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. बचत गट आर्थिक संकटात सापडणार आहेत. असे पूर्वनुमान यापूर्वी अभ्यासाअंती सभागृहाच्या माध्यमातून व पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणून दिले होते, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

 

निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी लक्षात आणून दिलेल्या पुर्वानुमानाची सरकारने दखल न घेतल्यामुळे निविदा प्रकिया पार पडली. पूर्वनुमानाप्रमाण वैद्य इंडस्ट्रीज या चिक्की घोटाळ्यातील ठेकेदाराची निवड करण्यात आली. ही योजना ठेकेदारांनी स्वत:च्या फायद्यासाठी तयार केली असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात या ठेकेदारांनी पुरविलेल्या निकृष्‍ठ नॅपकिनची विक्री न झाल्यामुळे बचत गटांचे खेळते भांडवल अडकून पडले आहे. त्यामुळे बचत गट प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एवढेच नाही तर या संदर्भातील अहवाल देखील काही अधिकार्‍यांनी शासनाला दिलेले आहेत. परंतु या ठेकेदारांवर तसेच यंत्रणेतील संबंधितांवर कारवाई करण्याची हिम्मत आपल्या सरकारमध्ये नाही, असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...