आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक आश्वासने पूर्ण न करणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फसवणुकीस : धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड.सत्तेत येण्याआधी भाजपच्या केंद्र आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी आश्वासने दिली होती. विशेषतः राज्य पातळीवर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. वास्तविक पाहता धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणासह अनेक समाजांना आश्वासने देऊ, असे म्हणणारे राज्य आणि केंद्र सरकार हे फसवे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 'देवेंद्र फडणवीस'ऐवजी 'देवेंद्र फसवणुकीस' असे आडनाव बदलण्याची वेळ आली आहे, अशी टीका करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडमधून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

 

धनगर समाज कर्मचारी महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, डॉ. शिवाजी राऊत, बबनराव सरवदे, माधवराव निर्मळ, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुंडे म्हणाले, हे सरकार नाकर्ते बनले आहे. यांना शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे काही घेणेदेणे नाही. मुख्यमंत्र्याबद्दल काही आम्ही बोललो तर आमच्याबद्दल काहीही आरोप केले जातात. परंतु आता आम्ही शांत बसणार नाहीत. या सरकारमधील नेत्यांनी अनेक खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली आहे. त्याची पूर्तता मात्र होत नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...