Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Dhangar community front with Jagaran Ghundhal

जागरण गोंधळासह धनगर समाजाचा मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:50 AM IST

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील खंडोबा मंदिरापासून पारंपरिक वेशात जा

  • Dhangar community front with Jagaran Ghundhal

    कोपरगाव- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील खंडोबा मंदिरापासून पारंपरिक वेशात जागरण गोंधळ करत मेंढ्यांसह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर कदम यांना मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांनी दिले.


    निवेदनात म्हटले आहे, चार वर्षांपूर्वी फडणवीस सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजमितीस त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिलेले नाही. बंद पडत असलेल्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला राखीव कुरणे मिळावे, तसेच मागील आंदोलनातील धनगर आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, आरक्षणामध्ये हुतात्मा झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत मिळावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या.


    मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शरद खरात, संजय कांबळे, प्रकाश करडे, शिवाजी कवडे, दीपक कांदळकर, योगेश नरोडे, रमेश टिक्कल, राजेंद्र टिक्कल, बापूसाहेब शिंदे, शिवाजी शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे, प्रभाकर शिंदे, सचिन कोळपे यांची भाषणे झाली. विविध संघटनांच्या वतीने धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिण्यात आला. या निवेदनावर प्रभाकर शिंदे, राजेंद्र नावडकर, किरण थोरात, सचिन कोळपे, जालिंदर चितळकर, विलास कोळपे, बाबासाहेब पानसरे, अशोक काकडे, आशिष वाघमारे, पंकज जाधव, अशोक मतकर, दत्तात्रय बढे, गणेश करडे, नंदू बडे, जालिंदर शेळके, भाऊसाहेब शेळके, ज्ञानेश्वर कोळपे, आशिष वाघमारे, शिवाजी शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे यांच्या सह्या आहेत.

Trending