आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाच्‍या मागणीसाठी यावलमध्‍ये धनगर समाजाचा मोर्चा, लवकर निर्णय न घेतल्‍यास तीव्र आंदोलनाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव) - आरक्षणाच्‍या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर ‘येडकोट येडकोट जय मल्हार’ च्या घोषणा देत धनगर समाजाने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी तहसिलदार व पोलिस निरिक्षकांना मागण्‍यांचे निवेदन देण्यात आले तर शासनाने आरक्षणासंर्दभात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे.

 

शहरातील तसेच तालुक्यातील किनगाव, मनवेेल, साकळी, गिरडगाव, सांगवी सह तालुकाभरात विखुलेला धनगर समाज सोमवारी एकत्र आला होता. हातात पिवळे ध्वज घेवुन धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणी करीता तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रभारी निवासी नायब तहसिलदार आर. बी. माळी, पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारतीय घटनेत धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश आहे.  त्यात धनगर ऐवजी धनगड असा शब्द प्रयोग झाला आहे. त्यामुळे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती पासुन वंचित रहावे लागत आहे. परिणामी समाज सामाजिक, अार्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात इतर समाजाच्या तुलनेत खुप मागे राहिला आहे.


सन २००२ मध्ये व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली घटना पुर्नविलोकन आयोगाने आमचे म्हणणे ऐकल्‍यावर व पुरावे मांडल्यावर, तसेच गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, हे मान्य केले तरीसुध्दा शासना कडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागु केले गेले नाही. त्‍यामुळे तात्काळ आरक्षण लागु करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यांदरम्‍यान देण्यात आलेल्या ग्रामीण व शहरी अशा दोन निवेदनांवर दिडशेहून अधिक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

याप्रसंगी नगरसेवक सुधाकर धनगर, डॉ. रमेश पाचपोळे, पी. एस. सोनवणे, भगवान धनगर, महेंद्र धनगर, पिंटू काटे, सचिन नायदे, गणेश धनगर, प्रविण कुयटे, शरद काटकर, रवी कुवर, भाऊसाहेब धनगर, कैलास धनगर, राजेंद्र कचरे, वसंत कचरे, संतोष पहेलवान, भास्कर बोरसे, श्रीराम धनगर, नितिन हडपे, कल्पेश भालेराव, सुधाकर निमायते, प्रकाश न्हाळदे, चंद्रकांत ठोके, चेतन पवार, कैलास अजलसोंडे, शरद बाऊस्कर, सागर निळे आदी उपस्थित होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...