आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर अारक्षणासाठी राज्यात निदर्शने, रास्ता राेकाे अांदाेलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने साेमवारी मराठवाड्यासह राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता राेकाे, ठिय्या अांदाेलने करण्यात अाली. जालन्यात तीन ठिकाणी टायरची जाळपाेळ व किरकाेळ दगडफेक या घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र अांदाेलन शांततेत पार पडले. 


भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातही रस्त्यांवर मेंढ्या साेडून रास्ता राेकाे करण्यात अाला. ज्या धनगर समाजाने भाजपला सत्ता मिळवून दिली ताे समाज सत्तेवरून खाली खेचूही शकताे, असा इशारा महात्मेंनी अापल्याच सरकारला दिला. लातूरमध्ये अांदाेलक शेळ्या-मेंढ्यांसह रस्त्यावर उतरले हाेते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नांदेडच्या अांदाेलकांनी हैदराबाद महामार्ग अडीच तास रोखून धरला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व सेलूत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून निषेध करण्यात अाला. अाैरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यातही अांदाेलनाचे पडसाद उमटले. जळगावातील इच्छादेवी चौकात पंधरा मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलनही झाले. रावेर येथेही दोन तास रास्ता राेकाे झाला. 


जामखेडला एसटीची पूजा 
जामखेड फाटा येथे रास्ता राेकाे अांदाेलन सुरू असताना एसटी महामंडळाच्या बसला न अडवता, अांदाेलकांनी तिची पूजा केली. इतकेच नव्हे तर चालक, वाहकाचा सत्कारही केला. अांदाेलकांच्या या सकारात्मक कृतीबद्दल परिवहन मंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

बातम्या आणखी आहेत...