आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला शॉपिंग करा या 4 शुभ मुहूर्तावर, 31 ऑक्टोबरला बुध-पुष्य नक्षत्र, 5 नोव्हेंबरला सोम-प्रदोष योगात साजरी होणार धनत्रयोदशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा दिवाळीच्या अगोदर खरेदी करण्यासाठी चार शुभ मुहूर्त आहेत. या शुभमुहुर्तात दिवशी खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच शुभ योगात खरेदी करणे उत्तम मानले जाते.

 

ज्योतिषशास्त्रानुसार, 27 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि 30 ऑक्टोबरला सिद्धी योग जुळून येत आहे. यानंतर 31 ऑक्टोबरला बुध-पुष्य नक्षत्र राहणार आहे. सकाळपासून रात्री 12 पर्यंत खरेदी केली जाऊ शकते. धनत्रयोदशी 5 नोव्हेंबरला असल्याने खरेदी करण्यासाठी 6 शुभ मुहूर्त आहेत.

 

खरेदी करा या शुभदिवशी
> उज्जेनचे ज्योतिषाचार्य पंडित श्याम नारायण व्यास यांच्यामते, 27 ऑक्टोबरला करवा चौथ असून या दिवशी रात्री 8.31 वाजता चंद्रोदय आहे. या दिवशी सकाळी 8.21 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील, ही वेळ खरेदीसाठी उत्तम आहे.

 

>30 ऑक्टोबर, मंगळवारी सकाळी 6.25 पासून संध्याकाळी 5.16 पर्यंत सिद्धी योग राहील. ही वेळ खरेदीसाठी उत्तम आहे.

 

> 31 ऑक्टोबरला सकाळी 6.35 पासून रात्री 2.33 पर्यंत बुध-पुष्य नक्षत्र आहे. या दिवशी सकाळी 6.35 पासून 7.59 पर्यंत लाभ, 7.59 पासून 9.23 पर्यंत अमृत, 10.47 पासून 12.11 पर्यंत शुभ, दुपारी 2.59 पासून संध्याकाळी 4.22 पर्यंत चर, 4.22 पासून 5.46 पर्यंत लाभ, 7.22 पासून रात्री 8.58 पर्यंत शुभ, 8.58 पासून 10.35 पर्यंत अमृत आणि 10.34 पासून 12.10 पर्यंत चर हे सर्व मुहूर्त खरेदीसाठी उत्तम आहे.

 

> 2 नोव्हेंबरला सकाळी 7.16 वाजता शुक्र उदय होणार आहे. व्यावहारिक दृष्ट्या हा काळ व्यवसायात प्रगती आणेल. या मुहूर्तावर आपण जमीन, इलेक्ट्रॉनिक वस्तु, सोने-चांदी, भांडे खरेदी करू शकतो.

 

> पंडित व्यास यांच्यामते, धनत्रयोदशी 5 नोव्हेंबरला आहे. सोम-प्रदोषच्या मुहूर्तावर धनत्रयोदशी आहे. या दिवशी वाहन, घर, जमीन, इलेक्ट्रॉनिक वस्तु, सोने-चांदी, भांडे खरेदी करू शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...