आजचे धनु / आजचे धनु राशिफळ, 4 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today (धनु आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Sep 04,2018 05:31:00 AM IST
धनु राशी, 4 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.


निगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.


काय करावे - गोमातेला वंदन करा.


लव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.


करिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.

X
COMMENT