Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 31 Aug 2018

धनु राशी : जाणून घ्या 31 Aug 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Today Sagittarius Horoscope (आजचे धनु राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • धनु आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 31 Aug 2018
  31 Aug 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या लोकांना चांगल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यन कराल परंतु तुमची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुमच्या राशीमध्ये धनलाभाचा योग आहे की नाही, कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - तुमच्या मनात अनेक प्रकारच्या इच्छा येतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या योजना आज बनू शकतात. कोणतीही योजना बनवाल तर त्यामधून मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. याच नोकरीत कामातही बदल होऊ शकतो. जे होईल तुमच्यासाठी चांगलेच असेल. काही नवे आणि रचनात्मक काम करण्याची इच्छा होईल. नवी टेक्नॉलॉजी शिकण्याची संधी मिळेल. एखाद्या व्यवहाराची माहिती मिळेल. तुमच्या फायद्याच्या योजना यशस्वी ठरतील. बिझनेसमध्ये संभ्रमावस्था आहे, पार्टनरशी स्पष्ट बोलून गैरसमज दूर होतील.


  निगेटिव्ह - मेहनतही जास्त राहील. थोड्या अडचणी येतील. भावनेच्या आहारी जाऊन असे काही बोलल ज्यामुळे अडचणीत वाढ होईल.


  काय करावे - भिन्न लिंगी व्यक्तीला अपशब्द बोलू नका आणि वादही घालू नका.


  लव्ह - लव्ह लाइफमध्ये सावध राहा. जुनी प्रकरणे पुन्हा डोके वर काढतील. तुमचे एखादे गुपित सार्वजनिक होण्याचा धोका आहे.


  करिअर - समजूतदारपणाचा फायदा आज तुम्हाला मिळेल. बिझनेससाठी काळ अनुकूल नाही. अभ्यासात मन लागेल. सोबती मदत करतील. विद्यार्थ्यांना यशासाठी मेहनत घ्यावी लागेल.


  हेल्थ - पोटाचे विकार होऊ शकतात. सावधगिरी बाळगा.

Trending