आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुरासनामुळे पाठीचे आणि पोटाचे स्नायू होतात बळकट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला धनुरासन म्हणतात. हे आसन पद्म साधनामधील एक आसन आहे.

  • धनुरासन कसे करावे?

> पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा. हात शरीरालगत असू द्या. > गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोटे पकडा. > श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला. > चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत सरळ पुढे पहा. शरीरातील ताण वाढेल तसे हास्य देखील वाढू द्या. > श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहा. तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे. > या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा. परंतु खूप ताण देऊ नका. > पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा.

  • फायदे

> पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात. > जननेंद्रियांना संजीवनी मिळते. > छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात. > पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात. > पाठीची लवचिकता वाढते. > तणाव आणि आळस निघून जाण्यास उत्तम > मासिक पाळीमधील अस्वस्थता आणि बद्धकोष्ठता दूर होते. > मूत्र रोगांवर उपयोगी.

  • खबरदारी

उच्च /कमी रक्तदाब असणाऱ्यांनी धनुरासनाचा सराव करू नये. हर्निया, मानेचे विकार, पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे, डोकेदुखी, अर्धशिशी, पोटाची शस्त्रक्रिया झालेल्यांनी धनुरासन करू नये. स्त्रियांनी गर्भारपणामध्ये हे आसन करू नये.