आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटील यांच्या मुलाचा मनसे प्रवेश, 5 ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबर रोजी एक सभा घेणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामध्ये मनसे नेमक्या किती जागांवर लढणार हे सांगितले जाणार असल्याची देखील चर्चा आहे. तत्पूर्वी राज यांनी इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेतल्या. तसेच महाराष्ट्र सरकारच्या धोरणांविरुद्ध ज्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती, त्यांच्या मुलाने मनसेत प्रवेश केला.
 

मनसेचे दोन उमेदवार घोषित 
दरम्यान धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याचे राज यांनी जाहीर केले. याशिवाय नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातार यांनी देखील मनसेत प्रवेश केला असून ते देखील निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. 
 

बातम्या आणखी आहेत...