Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Dharma Patil's son's agitation in top of the tower

टॉवरवर ८ तास ठिय्या देत धर्मा पाटील यांच्या मुलाचे आंदोलन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 08:40 AM IST

मागणी: जमिनीचा मोबदला द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • Dharma Patil's son's agitation in top of the tower

    विखरण- येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात जमीन गेेली. मात्र, अपेक्षित मोबदला न मिळाल्यामुळे मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने शुक्रवारी विखरण गावात मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. दुपारी १२ वाजेपासून तब्बल ८ तास टॉवरवर चढलेेल्या नरेंद्र यांच्याशी पोलिस, महसूल प्रशासन माइकवरून संवाद साधत होते.

    राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने शुक्रवारी नरेंद्र टॉवरवर चढले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते मागण्यांवर ठाम होते. दरम्यान, तहसीलदारांच्या आश्वासनांतर रात्री सव्वा आठ वाजता ते टॉवरवरून खाली उतरले.

    या आहेत मागण्या

    दोषींवर कारवाईचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. हे मंत्री जर स्वत:ची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र यांनी केला आहे.

Trending