आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलंबाे - क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलच्या एक आठवड्यानंतर अम्पायर कुमार धर्मसेनाने आपली चूक मान्य केली. इंग्लंडच्या ओव्हर थ्रोसाठी सहा नाही, तर केवळ पाच धावा द्यायला हव्या होत्या, असे धर्मसेना यांनी म्हटले. “इंग्लंडला सहा धावा देण्याची निश्चित चूक होती. मात्र, त्यावर पश्चात्ताप करण्यासारखे काही नाही. त्या चेंडूवर पाचच धावा दिल्या गेल्या असत्या, तर सामन्याचा निकाल बदला असता, असे आपण म्हणू शकत नाही. ‘ अंतिम सामन्यात इंग्लंडला तीन चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. तेव्हा मार्टिन गुप्टिलचा एक थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागला व सीमारेषेबाहेर गेला. इंग्लंडला या चेंडूवर सहा धावा देण्यात आल्या. दोन पळून काढलेल्या व ४ चौकाराच्या यावर वाद झाला. सामन्यानंतर आयसीसी पॅनलचे माजी अम्पायर सायमन टॉफेलने म्हटले की, त्या चेंडूवर पळून दोन नाही, तर एकच धाव दिली पाहिजे होती. कारण थ्रो करताना दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना पार केले नव्हते. त्यावर आता धर्मसेनाने म्हटले की, “टीव्ही रिप्लाय पाहून बोलणे सोपे आहे. मात्र, आम्हाला मैदानावर काही सेकंदांत हा निर्णय द्यावा लागतो. त्यानंतर मला रिप्ले पाहून चूक कळली. ऑन फील्ड निर्णयावर प्रायश्चित्त करणे योग्य नाही. त्या निर्णयावर कोणता खेळाडू बाद होण्याची घटना नव्हती, त्यामुळे आम्ही त्याला थर्ड अम्पायरलादेखील सांगू शकत नाही. त्यामुळे मी लेग अम्पायरशी चर्चा केली आणि आम्हाला जे योग्य वाटले, ते केले. मात्र, याच चुकीच्या निर्णयाचा माेठा फटका न्यूझीलंड संघाला बसला अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.