आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मुलींच्या लग्नात थिरकले धर्मेंद्र आणि जितेंद्र, सोबतच प्रेम चोप्रा आणि रणजितच्या डायलॉग्सने केले लोकांचे मनोरंजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर(राजस्थान)- सुपर-स्टार जीतेंद्र आणि धर्मेंद्र रविवारी लग्नसोहळ्यासाठी जोधपूरला आले होते. त्यांच्यासोबत खलनायक म्हमून लोकप्रिय झालेले प्रेम चोप्रा आणि रणजित यांनीही या लग्नात हजेरी लावली होती. हे सर्व अभिनेते बिझनेसमॅन सुरेश जाजड यांच्या दोन्ही मुलींना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. सुरेश यांच्या दोन्ही मुलींचे लग्न एकाच दिवशी होते. पुजाचे लग्न विवेकसोबत शनिवारी बालसमंद पॅलेसमध्ये झाले तर कविताचे लग्न प्रभातसोबत रविवारी रात्री हॉटेल उम्मेदमध्ये पार पडले. लग्नात सहभागी होण्यासाठी अनिक कपूरनेदेखील हजेरी लावली होती.


असे पहिल्यांदाच घडले की, या शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नात बॉलिवूडचे दिग्गज मंडळी आले होते. यापुर्वी 16 मे रोजी झालेल्या संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी गोविंदाही आला होता. रविवारी रात्री आयोजित केलल्या सेरेमनी दरम्यान जितेंद्र आणि प्रेम चोप्रा एका ओपन गाडीमध्ये मंडपात पोहचले तर धर्मेंद्र यांनी बग्गीद्वारे आपली स्पेशल एंट्री केली. या दरम्यान या कलाकारांनी आपल्या हिट गाण्यांवर ताल धरला आणि सर्व पाहूने मंडळींना नाचायला भाग पाडले. यावेळी धर्मेंद्र यांनी 'पल-पल दिल के पास तुम रहती हो...', 'गर तुम भुला न दोगे...', 'ये दिल दीवाना है...', या गाण्यावर डांस केला. तर जितेंद्र यांनी आज 'सुबह जब मैं जागा...', 'शीशा हो या दिल हो...', 'मस्त बहारो का मैं आशिक़...' सारख्या सदाबहार गाण्यांवर थिरकले. आता या दोघांनी ठेका धरला म्हटल्यावर आपले प्रेम चोप्रा आणि रणजीत कसे मागे राहणार त्यांनीही एकापेक्षा एक गाण्यावर डांस केला.

बातम्या आणखी आहेत...