Home | Business | Business Special | Dharmendra birth day special news

एकेकाळी नोकरी सोडून मुंबईला पळून आले होते धर्मेंद्र; आज आहे 110 कोटींचे मालक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 01:13 PM IST

धर्मेंद्र यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या संपत्तीविषी खास माहिती

 • Dharmendra birth day special news

  नवी दिल्ली- एकेकाळी धर्मेंद्र अमेरिकन ट्युबवेलची नोकरी सोडून मुंबईला पळून आले होते. मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आजही आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. 2014 मध्ये धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी मथुरेतील निवडणूकीत जाहीर केलेल्या शपथ पत्रामध्ये धर्मेंद्र यांची एकुण संपत्ती 110 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.

  प्रॉपर्टीत गुंतवले आहे सर्वात जास्त पैसे
  > हेमा मालिनी यांच्या शपथ पत्रानुसार, 2014 मध्ये धर्मेंद्र यांच्याकडे दोन प्लॉट होते. त्यापैकी मुंबईत जुहूमध्ये 14 हजार फूट जागेवर असलेल्या बंगल्याची किंमत 90 कोटी रुपये होती. तर हेमा मालिनींच्या घराची किंमत 38 कोटी होती. त्याशिवाय गोरेगावमध्ये धर्मेंद्र यांचे 2.15 कोटींचे घर होते. या याशिवाय हेमा यांच्याकडे सध्या 5 घरे आहे.

  धर्मेंद्र यांच्याकडे 13 कोटींपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता
  > हेमा मालिनींच्या शपथ पत्रानुसार, धर्मेंद्र यांच्यापेक्षा हेमा मालिनींकडे जास्त स्थावर मालमत्ता आहे. धर्मेंद्र यांची स्थावर मालमत्ता 4.99 कोटी तर हेमा यांच्याकडे 8.68 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

  धर्मेंद्र यांच्याकडे असलेली स्थावर मालमत्ता
  > सोने- 53 लाख
  > 1997 सालची रेंज रोव्हर- 70 लाख किंमत
  > मारुती 800 कार- 8 हजार रुपये किंमत
  > मोटर सायकल- 37 हजार रुपये किंमत

Trending