Home | Gossip | dharmendra celebrating his 83 birthday

धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आपल्या एकमात्र मुलाखतीत म्हणाल्या होत्या, 'जर मी हेमाच्या जागी असते तर हे कधी केले नसते जे हेमाने केले'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:54 PM IST

धर्मेंद्र जरी चांगले पती नसले तरी ते एक जबाबदार पिता आहेत - प्रकाश कौर..

 • dharmendra celebrating his 83 birthday

  मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते धर्मेन्द्र आज आपला 83 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कित्तेक सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या धर्मेंद्रने आपल्या आयुष्यात दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे आणि दुसरी पत्नी म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी. धर्मेंद्रने आपल्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेताच हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते. धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नी लाइमलाईटपासून तशा दूर असतात. पण त्यांच्या एकमात्र मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "जर मी हेमाच्या जागी असते तर हे कधीच नसते केले जे त्यांनी केले."

  याच मुलाखतीतील काही भाग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

  1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत अरेंज्ड मॅरेज झाले होते. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. अजय सिंह (सनी), विजय सिंह (बॉबी), विजेता आणि अजेता देओल ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. धर्मेंद्र यांच्या दुस-या लग्नानंतर अनेक प्रकारच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. असेही म्हटले गेले होते, की सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. मात्र जेव्हा या बातम्या आल्या होत्या, तेव्हा प्रकाश कौर यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी म्हटले होते, की धर्मेंद्र यांची बाजू घेताना म्हटले होते, की ते एक चांगले पती नसतील, मात्र एक खूप चांगले वडील आहेत. प्रकाश कौर यांनी 1981मध्ये 'स्टारडस्ट' या प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटले होते.

  मुलाखतीसाठी तयार नव्हत्या प्रकाश कौर..

  मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, प्रकाश कौर यांची मुलाखत घेणे हे सोपे काम नव्हते. त्या फोनवर कुणाशी बोलायच्या नाही, शिवाय घरीसुद्धा कुणाला भेटायच्या नाही. रिपोर्टर दररोज त्यांच्या घरी फे-या घालायची, मात्र तिला कोणतेही कारण देऊन परत पाठवून द्यायचे. कधी सांगितले जायचे, की प्रकाश कौर घरी नाहीत, तर कधी त्या झोपल्या आहेत, असे रिपोर्टरला सांगितले जायचे. मात्र सरतेशेवची रिपोर्टरच्या प्रयत्नांना यश आले आणि प्रकाश कौर

  मुलाखत द्यायला तयार झाल्या.

  इंग्रजी येत नसल्याचे दिले होते कारण..

  मुलाखतीदरम्यान प्रकाश कौर यांनी इंग्रजी येत नसल्याचे कारण दिले होते. त्यांनी रिपोर्टरला म्हटले होते, की ''माझी इंग्रजी चांगली नाहीये. त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही.'' जेव्हा रिपोर्टर तेथून जायला तयार झाली नाही, तेव्हा प्रकाश कौर म्हणाल्या, "मी एक गृहिणी आहे. माझे माझ्या घरावर आणि मुलांवर जीवापाड प्रेम आहे. लोक माझ्या राहणीमानाविषयी काय म्हणतात, हे मला ठाऊक नाही. सर्वांचे स्वतःचे एक राहणीमान असते."

  'ते एक खूप चांगले वडील आहेत..'

  प्रकाश कौर यांनी मुलाखतीत म्हटले होते, की धर्मेंद्र एक चांगले पती होऊ शकले नाहीत, मात्र ते एक खूप चांगले वडील आहेत. त्यांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे. ते कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते अजय (सनी) ला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहेत. सर्वांना वाटतं, की त्यांनी सनीला बॉलिवूडमध्ये लाँच केले, तरच हेमासोबत लग्न करु शकतील, अशी मी त्यांच्याशी डील केली आहे. मात्र हे खरे नाहीये. असे कसे होऊ शकते. सनी त्यांचा मुलगा नाहीये का? मी जेवढे सनीवर प्रेम करते, तेवढेच ते देखील करतात.

Trending