आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 83 व्या वर्षी रोज मॉर्निंग वॉकवर जातात धर्मेंद्र, कडाक्याच्या थंडीमध्येही बघतात सुर्योदय, आता शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी घालवत आहेत आयुष्य, म्हणाले - मी जराही हस्तक्षेप सहन करु शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. गतकाळातील अभिनेते धर्मेंद्र(83) पुन्हा एका त्यांच्या नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आपल्या लोणावळा येथील फार्महाउसवर फिरताना आणि निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. वयाच्या 83 व्या वर्षीही ते एकदम फिट दिसतात. धर्मेंद्र रोज मॉर्निंग वॉकवर जातात. कडाक्याची थंडी असो किंवा मग वातावरण खराब असो ते कधीच वॉकवर जाणे मिस करत नाही. धर्मेंद्र यांना उगवता सुर्य पाहायला खुप आवडते. धर्मेंद्र यांनी स्वतः पोस्ट करुन सांगितले की, "हे नाव मिळवण्यासाठी मी वेड्यासारखी तपस्या केली, मला साठ वर्षात मिळालेले हे फळ मला प्राणप्रिय आहे. निसर्गाच्या कुशीत जात असलेले माझे हे निवांत आयुष्यात मी शहरी जगतातील थोडाही हस्तक्षेप सहन करु शकत नाही. मातीतला मुलगा आहे आणि प्रेम करतो आणि प्रेमाची अपेक्षा करतो."  सध्या ते मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यापासून दूर आता निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य घालवत आहेत. त्यांनी येथे ऑर्गेनिक भाज्या यासोबतच अनेक गायी-म्हशी, कुत्रे, बदक, घोडे आणि कोंबड्या पाळल्या आहेत. अनेक वेळा धर्मेंद्र फोटो शेअर करतात यामध्ये ते गायीचे दूध काढताना दिसतात तर कधी पाळीव कुत्र्यांसोबत खेळताना दिसतात. त्यांच्या फार्महाउसच्या आजुबाजूला पहाड आणि झरा आहे. 

 

6 दशकांच्या दिर्घ करिअरमध्ये धर्मेंद्र यांनी जवळपास 270 चित्रपट केले 
- धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "ते अॅक्टर नव्हते त्या काळात ते जालंधरच्या संत सिनेमामध्ये चित्रपट पाहायला जायचे. येथे चित्रपट बघूनन त्यांना हिरो बनण्याची इच्छा झाली. संत सिनेमा 11 वर्षांपुर्वी बंद झाला, तेव्हा आत्महत्येप्रकरणी येथे भांडण झाले होते. आता याची बिल्डिंगही जमीनदोस्त झाली आहे."
- धर्मेंद्र यांनी 1958 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' मधून डेब्यू केला होता. आपल्या 6 दशकांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र यांनी जवळपास 270 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
- चित्रपटांविषयी त्यांचा जिव्हाळा सांगताना धर्मेंद्र म्हणतात की, "मी एक न्यू कमर आहे अशी जाणिवल मला नेहमी होते, जो एक संदेश मिळाल्यानंतर मुंबईमध्ये आला होता आणि अॅक्टर बनला. कॅमेरा फेस करण्यासाठी मी नेहमी उत्साहित असतो. चांगली स्क्रिप्ट पाहूनच मी काम करतो. मी अॅक्टर बनावे हे माझे स्वप्न होते आणि हे काम मी दिर्घकाळ करत राहणार."

 

धर्मेंद्र यांना आहेत 6 मुलं 
- धर्मेंद्र याच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर लाइमलाइटपासून दूर राहतात. त्यांचे खुप कमी फोटोज समोर आले आहेत. धर्मेंद्रने प्रकाश यांच्यासोबत 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केले होते. या कपलला चार मुलं अजय सिंह (सनी), विजय सिंह (बॉबी), विजेता आणि अजेता देओल आहेत.
- धर्मेंद्रने प्रकाश कौरसोबत लग्न केले तेव्हा हेमा फक्त सहा वर्षांची होती. नंतर त्यांनी हेमासोबत दूसरे लग्न केले. हे त्यांचे दूसरे लग्न होते, हेमा यांना दोन मुली ईशा आणि अहाना आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...