आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

82 वर्षांच्या धर्मेद्र यांनी देशाला गोल्ड मेडल मिळवून देण्या-या बॉक्सरची घेतली भेट, म्हणाले मला तुझ्यावर अभिमान आहे, ऑलेम्पिकमध्ये तु नक्कीच कमाल करशील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 82 वर्षांच्या धर्मेद्र यांनी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहे. यामध्ये ते 18 व्या एशियन गेम्समध्ये बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणा-या अमित पंघाल, त्याचे वडील विजेंद्र पंघाल आणि कोच अनिल धनखडसोबत दिसत आहे. एका फोटोवर धर्मेंद्र यांनी लिहिले की, "अमित पंघाल(एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगचे गोल्ड मेडलिस्ट) मला तुझ्यावर अभिमान आहे. आकाश सीमा आहे आणि मला विश्वास आहे की, तु नक्कीच ओलम्पिकमध्ये कमाल करशील. तु तुझे वडील आणि गुरुसोबत मला भेटायला आला, याचा मला खुप आनंद आहे. तुझ्यावर नेहमी देवाची कृपा राहो."


दोन महिन्यांपुर्वी अमितने व्यक्त केली होती धर्मेंद्र यांना भेटण्याची इच्छा 
- याचवर्षी सप्टेंबरमध्ये इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये 22 वर्षांच्या अमित पंघालने 18 व्या एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये 49 किलो वजन गटात गोल्ड मेडल मिळवले होते. यानंतर त्याने ट्वीट करुन हे मेडल देशाला समर्पित केले होते. अमितने ट्वीटवर लिहिले होते की, "जकार्तामध्ये सुवर्ण पदक देशाला समर्पित.... शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. माझे पहिले ट्वीट माझे वडील आणि कोच साहेंबाची इच्छा सांगण्यासाठी आहे. दोघंही धर्मेंद्र यांचे मोठे फॅन आहेत. त्यांचा चित्रपट सुरु असताना ते ब्रेक आलेला असतानाही चॅनल चेंज करु देत नाहीत. धरमजींसोबत भेट झाली तर आनंद होईल."

 

उत्तर देत धर्मेंद्र म्हणाले होते की, मलाही तुम्हाला भेटून आनंद होईल 
- अणित यांच्या ट्वीटवर धर्मेंद्र यांनी तात्काळ रिप्लाय दिला होता. त्यांनी लिहिले होते की, "अमित पंघाल आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. मलाही तुला भेटून आनंद होईल. जेव्हा मुंबईत येथील तेव्हा सांग. तुझ्या गुरुंना आणि कुटूंबाला शुभेच्छा. देवाकडे हीच प्रार्थन करतो की, प्रत्येक स्पर्धेत यश मिळव आणि देशाचे नाव मोठे कर,  "

 

बातम्या आणखी आहेत...