• Home
  • Bollywood
  • News
  • Dharmendra said always giving love, will keep returning the love which i get from fans, this is my Valentine's Day message.

विचार / धर्मेन्द्र म्हणाले - नेहमी प्रेम देत आलो आहे, फॅन्सकडून मिळालेले प्रेम यापुढे परत करत राहीन, हाच माझा व्हॅलेन्टाईन डे मॅसेज

धर्मेंद्र म्हणाले, 'मुंबईला येऊन कळाले की, व्हॅलेन्टाईन डे असेही काहीतरी असते'

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 04:26:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : व्हॅलेन्टाईन डेनिमित्त दैनिक भास्करसोबत बातचीतीमध्ये दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'मी तर नेहमी माझ्या चाहत्यांना प्रेम अर्पत आलो आहे. जेव्हा पासून इंडस्ट्रीमध्ये आलो आहे. तेव्हापासून लोक माझ्याबद्दल पॉझिटिव्हच वाचतात. माझ्यावेळी तर व्हॅलेन्टाईन डेबद्दल माहीतच नसायचे. माझ्यासाठी तर प्रत्येकच दिवस व्हॅलेन्टाईन डे होता. जिथे प्रेम मिळाले, व्हॅलेन्टाईन डे झाला.


'मुंबईला येऊन कळाले की, व्हॅलेन्टाईन डेसुद्धा काहीतरी असते'


जेव्हा गावामध्ये राहायचो तेव्हा माहित नसायचे की, व्हॅलेन्टाईन डे कशाला म्हणतात, येथे मुंबईला येऊन याबद्दल कळाले. लोकांना प्रेमच प्रेम दिले आहे तर फांदेखील पाकला प्रेमच देतात. आधी आपल्या चित्रपटाद्वारे, आता रेस्तरॉंद्वारे किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांचे प्रेम मी त्यांच्यातच वाटत आहे.


जर तुम्ही माझ्या प्रेमाची कहाणी ऐकू इच्छित आहात तर ती ही आहे की, हेमाजी आणि मी चित्रपटात काम करत चांगले मित्र बनलो. मला त्यांची कंपनी आवडायची आणि त्यांना माझी सोबत. आम्ही एकमेकांसोबत अनेक चित्रपट केले. एकदा तर अशी वेळ होती जेव्हा आम्ही अनेक महिने एकत्र शूटिंग करायचो. जसजशी वेळ पुढे जाऊ लागली, आमचे एकमेकांविषयीचे आकर्षण वाढले. मी त्यांच्याजवळ राहण्यासाठी कारणं शोधायचो. अशाच आमच्या अनेक सुखद आठवणी आहेत.


एकदा तर 1975 मध्ये 'चरस' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जेव्हा माही माल्टा येथे जात होतो. तेव्हा प्लेनमध्ये हेमाजी यांच्या सीटच्या जवळ बसण्यासाठी मी काहीतरी कारण सांगितले होते. मी वाचले आहे की, याचा हेमा जींनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. आज आम्ही ते सर्व आठवून हसत असतो. त्यानंतर आम्ही एक झालो. त्यांच्या कुटुंबीयांनीम मला खूप प्रेमाने स्वीकारले. हो एवढे मात्र नक्की होते, आमच्या नात्याबद्दल त्यावेळी अनेक कॉंट्रोव्हर्सीज बळजबरीने उभ्या केल्या गेल्या होत्या.


मी यापूर्वीही त्या सर्व गोष्टी स्पष्टपणे नाकारण्या आहेत आणि सांगितले आहे की, त्या प्रकारचा व्यक्ती नाहीये जो आपल्या फायद्यासाठी काही चुकीचेच करेन. असो, आमचा व्हॅलेन्टाईन डे तर हाच आहे की, प्रेम वाटत चला. लोक मला 'गरम धरम', 'ही-मॅन', 'धरम पाजी' यांसारख्या नावांनी संबोधतात. आता या प्रेमळ नावांची भेट म्हणून त्यांच्यासाठी एक मधुर फूड सेंटर सुरू केले जात आहे. यापूर्वी ‘गरम धरम’ नाव दिले होते आता याच व्हॅलेन्टाईन डेला आम्ही 'ही-मॅन' नावाचे रेस्तरॉ करनाल येथे सुरु करत आहोत.


जसे प्रेम माझ्यासाठी उपासना आहे, तसेच माझ्यासाठी कामदेखील माझी पूजा आहे. मी काहीही करेन, जे चांगले काम असेल, ते आजही करेन. मी बसू शकत नाही. ज्या दिवशी बसलो, समजा त्या दिवशी थांबलो. मी चालतच राहू इच्छितो, आणि याच प्रकारे फॅन्सकडून मिळालेले प्रेम मी सर्वांमधेर वाटत राहीन. हाच माझा या व्हॅलेन्टाईन डेला संदेश आहे.

X