आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmendra Share New Video Of Farmhouse He Spend Time Mostly Time At Lonavala Farmhouse

82 वर्षांच्या धर्मेंद्र यांनी शेअर केला फार्महाउसचा नवीन व्हिडिओ, म्हणाले- शेती करणे माझी हॉबी आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 82 वर्षांचे धर्मेंद्र नेहमीच आपल्या फार्महाउसचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. सोमवारी त्यांनी फार्महाउसचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते फूलांमध्ये आपल्या लग्जरी गाडीजवळ बसलेले दिसत आहेत. ते बोगनवेलिया फूलांविषयी सांगत आहेत, त्यांच्या फार्महाउसमध्ये अनेक रंगांचे बोगनवेलिया उमलले आहे. त्यांनी सांगितले की, शेती करणे माझा छंद आहे. त्यांना त्यांच्या फार्महाउसमध्ये वेळ घालवणे चांगले वाटते. 


त्यांचे हे फार्महाउस मुंबई जवळ लोणावळ्यात आहे 
- धर्मेंद्र हे सिटीतील धावपळीच्या जीवनापासून दूर जास्त वेळ हे फार्महाउसवर असतात. 
- एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले होते की, "मी जाट आहे आणि जाट जमीन आणि आपल्या शेतांवर प्रेम करतात. माझा जास्तीत जास्त काळ हा लोणावळ्यातील आपल्या फार्महाउसवर जातो. आमचा फोकस ऑर्गेनिक शेतीवर आहे, आम्ही तांदळाची शेती करतो. फार्म हाउसवर माझ्या काही म्हशीदेखील आहेत."
- फेसबुकवर 'धर्मेंद्र-ही मॅन' नावाने पेज आहे. यावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक फोटोज शेअर केले आहेत. धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये 'प्रतिज्ञा', 'राम बलराम', 'आंखे', 'चरस', 'चाचा भतीजा', 'धरम वीर', 'राज तिलक', 'खतरों के खिलाड़ी' सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...