आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

83 वर्षांच्या धर्मेंद्र यांना झाला डेंग्यू, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर घरी परतले 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेता धर्मेंद्र यांना अशातच खार, मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांना तिथून घरी आणले गेले. रिपोर्ट्सनुसार, 83 वर्षांच्या धर्मेंद्र यांना मागच्या आठवड्यात डेंग्यू डिटेक्ट झाला होता, ज्यामुळे बॉबी देओलने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.  

आता मुंबईमध्ये आराम करत आहेत धर्मेंद्र... 
सांगितले जात आहे की, धर्मेंद्र लवकरात लवकर हॉस्पिटलमधून घरी जाऊ इच्छित होते. यामुळे तीन दिवसांनंतर डिस्चार्ज केले गेले. सनी देओल त्यांना घेऊन मुंबईमधील घरी पोहोचले. रिपोर्ट्समध्ये सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे लिहिले गेले आहे की, जास्तीत जास्त लोणावळा येथील फार्महाऊसमध्ये राहणारे धर्मेंद्र सध्या मुंबईमध्येच आराम करत आहेत. फार्महाऊसवर जाण्याचा त्यांचा सध्या काहीही प्लॅन नाही.  

नातवाचा चित्रपट प्रमोट करताना दिसले होते धर्मेंद्र... 
मागचा महिना धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करणचा डेब्यू चित्रपट 'पल पल दिल के पास' रिलीज झाला. हा त्यांचे होम प्रॉडक्शन विजेता फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला आहे. सनी देओलने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. धर्मेंद्र या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक टीव्ही शोज आणि प्रेस कॉन्फरन्सचा भाग बनले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.