आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmendra's Eyes Filled With Tears, Sunny And Karan Were Also Get Emotional Due To One Performance On The Set Of 'Dance Divane'.

'डान्स दीवाने' च्या सेटवर कॅन्टेस्टंटचा परफॉर्मन्स पाहून भरून आले धर्मेंद्र यांचे डोळे, सनी, करणदेखील झाले इमोशनल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेते आणि सुपरस्टार धर्मेंद्र अशातच मुलगा सनी देओल, नातू करण आणि न्यूकमर सहर बाम्बासोबत डान्सिंग रिऍलिटी शो 'डान्स दीवाने' च्या सेटवर पोहोचले होते. तिथे त्यांनी करण आणि सहरचा डेब्यू चित्रपट 'पल पल दिल के पास' चे प्रमोशन केले. सूत्रांनुसार, एक डान्स परफॉर्मन्स पाहून धर्मेंद्र यांचे डोळे भरून आले. हे पाहून सनी आणि करणदेखील भावुक झाले.  

परफॉर्मन्समध्ये दिसला धर्मेंद्र यांचा जीवन प्रवास... 
सेटशी निगडित एका जवळच्या सूत्राने सांगितले, "शूटिंगदरम्यान कन्टेस्टंटने धर्मेंद्र यांना ट्रिब्यूट देण्यासाठी एक परफॉर्मन्स दिला. ज्यामध्ये त्यांचा जीवनप्रवास दाखवला गेला. हा अॅक्ट धर्मेंद्र यांना खूप भावाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडिलांच्या डोळ्यात पाणी पाहून सनी देओलदेखील स्वतःला सांभाळू शकला नाही आणि तोही भावुक झाला. करणदेखील इमोशनल झाला आणि लगेच आजोबा धर्मेंद्र यांच्या जवळ जाऊन त्याने त्यांना आलिंगन दिले. नंतर धर्मेंद्र यांनी अॅक्टसाठी कॅन्टेस्टंटचे आभार मानले."

स्वतःला वडिलांपेक्षा उत्तम डान्सर मानतो करण... 
मंगळवारी चित्रपटाच्या एका प्रमोशनदरम्यान मुलाखतीत करण म्हणाला की, तो आपल्या वडिलांपेक्षा उत्तम डान्सर आहे. मात्र काका बॉबी देओलपेक्षा चांगला डान्स करू शकत नाही. करण म्हणाला, "मी वाईट डान्सर नाहीये. जर गरज पडली तर नाचू शकतो. पण मी अमेजिंग डान्सर नाहीये. जर तुम्ही मला एखादी स्टेप दाखवली तर मी ती शिकेन. पण जर तुम्ही मला अचानक डान्स करायला सांगितले, तर मी नाही करू शकणार."

वडिलांनी शिकवले कधीही खोटे बोलायचे नाही... 
करणने मुलाखतीत पुढे सांगितले, "माझे पिता (सनी देओल) मला मला नेहमी सांगतात की, कोणत्याही कामात स्वतःला 100 झोकून द्यावे. कधीही स्वतःशी खोटे बोलयचे नाही. काका (बॉबी देओल) ने मला सांगितले आहे की, डान्सिंगमध्ये जास्त फ्लेक्सिबल असले पाहिजे." 

सनी देओलच्या दिग्दर्शनात आणि धर्मेंद्र यांच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेला चित्रपट 'पल पल दिल के पास' 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.