आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhawan Has No Half century In 2019; Shikhar Dhawan In Team India Place For T20 Series Against Sri Lanka, Last Chance Before World Cup In T20

धवनचे 2019 मध्ये एकही अर्धशतक नाही; टी-20 मध्ये विश्वचषकापूर्वी अखेरची संधी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी टी-20 मध्ये धवनची 41 सर्वोत्तम खेळी
  • धवनने म्हटले - ही माझी नवीन सुरुवात

​​​​​​नवी दिल्ली : शिखर धवन दुखापतीनंतर पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये परतला. तो पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत खेळेल. गेल्या वर्षी धवनची कामगिरी चांगली राहिली नााही. तो १२ टी-२० सामन्यांत एकही अर्धशतक करू शकला नाही. ४१ त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. दुसरीकडे लोकेश राहुलने ६ सामने खेळले आणि ३ अर्धशतके झळकवली. अशात सलामीवीरासाठी निवड समितीवर दबाव वाढला. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. अशात धवन टी-२० मध्ये चांगली कामगिरी करू न शकल्यास ऑस्ट्रेलियातील आगामी टी-२० विश्वचषकासाठी खेळणे कठीण राहील. धवनकडे संघात स्थान मिळवण्यासाठी अखेरची संधी आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तिसरा सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला सोबत ठेवले आहे. त्यानंतर टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडमध्ये टीमला ५ टी-२० सामने खेळायचे आहे.

गेल्या वर्षी धवनची एकही कसोटी नाही

धवनने अखेरची कसोटी सप्टेंबर २०१८ मध्ये ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली. खराब कामगिरीमुळे तो कसोटी संघातूून बाहेर झाला. तो बुधवारी रणजी ट्रॉफी सामन्यात हैदराबादचे नेतृत्व करेल. तो गेल्या वर्षी बोट, नाक, डोळे व गुडघ्याच्या दुखापतीमुळे सतत त्रस्त होता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो या मालिकेत खेळेल.

टी २० : धवनच्या १२ डावांत २७२ धावा, राहुलच्या ६ डावांत २८१ धावा

२०१९ मध्ये सलामीवीर रोहितने सर्वाधिक ३९६ धावा काढल्या. मात्र त्याने त्यासाठी १४ डाव (८५ सर्वोच्च खेळी) खेळले. १३९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. राहुलने ६ डावांत २८१ धावा (९१ सर्वोच्च खेळी) ठोकल्या. त्याचा १५० चा स्ट्राइक रेट राहिला. धवन १२ डावांत २७२ धावांसह (४१ सर्वाेच्च खेळी) तिसऱ्या स्थानी राहिला. १११ चा स्ट्राइक रेट.


खेळाडू : डाव : धावा : सरासरी : 100
रोहित शर्मा : 14 : 396 : 28 : 4
लोकेश राहुल : 6 : 281 : 47 : 3
शिखर धवन : 12 : 272 : 23 : 0

वनडे : धवनची सरासरी ४० च्या आत, केेवळ ४ वेळा ५० + धावा

२०१९ मध्ये टीम इंडियाने वनडेत ३ सलामीवीरांना संधी दिली. रोहितने २७ डावांत ५५७ च्या सरासरीने धावा करत ७ शतके व ६ अर्धशतके ठोकली. ३६ षटकार मारले. धवनने १७ डावांत केवळ ३६ व्या सरासरीने धावा केल्या. २ शतके व २ अर्धशतक केेले. राहुलने १० डावांत ५१ च्या सरासरीने धावा केल्या.


खेळाडू : डाव : धावा : सरासरी : 100
रोहित शर्मा : 27 : 1490 : 57 : 7
शिखर धवन : 17 : 583 : 36 : 2
लोकेश राहुल : 10 : 509 : 51 : 2

४ देशांच्या सामन्यासाठी इतर सदस्य देशांशी होणार चर्चा : ईसीबी

लंडन : इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी म्हटले की, बीसीसीआयच्या चार देशांच्या स्पर्धेेसाठी त्याची चर्चा सुरू आहे. २०२१ पासून त्याला सुरुवात होईल. त्याला २०२३ पासून आयसीसीच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या मोठ्या स्पर्धेसाठी रोखण्यासाठी केले जात आहे. चार देशांच्या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व इतर एका देशाचा समावेश असेल. पहिले सत्र भारतात होण्याची शक्यता आहे. ईसीबीने म्हटले की, डिसेंबरमध्ये स्पर्धेबाबत बीसीसीआयशी चर्चा झाली.