Home | Bollywood | Marathi Cinekatta | dhondi champya ek prem katha news in Marathi

'धोंडी चंप्या' उलगडणार निखिल आणि सायलीची लव्हेबल कथा

दिव्य मराठी | Update - Mar 25, 2019, 10:37 AM IST

निखिल चव्हाण आणि सायली पाटीलची लव्हेबल केमिस्ट्री... 'धोंडी चंप्या' एक प्रेमकथा

  • dhondi champya ek prem katha news in Marathi

    'लगीर झालं जी' फेम निखिल चव्हाण चा अभिनयक्षेत्राचा आलेख दिवसागणिक उंचावतच चालला आहे. चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरिजस चा एकामागून-एक धडाका लावणारा निखिल आत्ता एका लव्हस्टोरीचा हिरो म्हणून लवकरच आपल्या समोर येणार आहे. 'धोंडी चंप्या' एक प्रेमकथा या आगामी काळात निखिल प्रेक्षकांना हसवणार आहे. प्रेमकथा म्हटलं तर हिरोईन आलीच. निखिल सोबत जोडी जमलीये सायली पाटीलची. 'गणपती बाप्पा मोरया' मालिका "बॉईज २"चित्रपट आणि 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' वेबसिरीज फेम सायली आणि निखिल पहिल्यांदाच लीड पेअर म्हणून आपल्यासमोर येणार आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या' लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.


    निखिल चव्हाण अभिनित झी ५ वरील 'वीरगती' तर .....शुद्ध देसी मराठी ची 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या वेबसीरीज अलीकडेच प्रचंड गाजल्या. निखिलने आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत पण 'धोंडी चंप्या' या चित्रपटाची बातच न्यारी आहे. या चित्रपटाद्वारे निखिल प्रथमच लीड रोल मध्ये दिसेल शिवय हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट असल्यामुळे रसिकांना निखिलमधला आणखी एक अभिनयपैलू पाहायला मिळेल. 'अनोळखी हे घर माझे', 'गोलमाल', 'बेधुंद' यांसारख्या चित्रपटांचे तर 'कॉमेडी एक्स्प्रेस', 'आंबट गोड', 'कॉमेडी डॉट कॅम, 'साहेब बीबी आणि मी', 'कोपरखळी' यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन करणारे ज्ञानेश भालेकरांनी 'धोंडी चंप्या' चे दिग्दर्शन केले आहे. कुठल्याही कथानकाला विनोदी ढाच्यात सामावून घेत रसिकांपुढे मांडण्याचं ज्ञानेश भालेकरांचं कसब वाखाणण्याजोगं आहे.

    'धोंडी चंप्या'ची प्रेमकथा म्हणजे एका म्हैस आणि रेड्याच्या अनुषंगानने उलगडते. मजेशीर कथानकाला कलाकारांच्या अभिनयाने जो काही तडक दिलाय त्याने प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होणार यात काही शंका नाही. एका गावातील तालेवार बागायतदार उमाजी आणि अंकुश यांच्यात चालत आलेल्या परंपरागत वैरामुले धोंडी आणि चंप्या बाली पडतात. उमाजी म्हणजेच भारत जाधव आणि अंकुश म्हणजेच वैभव मांगले यांच्या मुलांच्या भूमिकेत निखिल आणि सायली दिसतील. वडीलांप्रमाने भांडता भांडता निखिल आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि प्रेमाचा लपंडाव आणखी जोरोशोरोसे चालू होतो. धोंडी आणि चंप्याची प्रेमकथा सफल करण्यात निखिल आणि सायली यशस्वी होतात का हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.

  • dhondi champya ek prem katha news in Marathi
  • dhondi champya ek prem katha news in Marathi

Trending